सरकारी फर्म C-DoT स्वदेशी ४G आणि ५G नेटवर्क तंत्रज्ञानावर काम करत आहे. ज्यासाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे की सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएल कडून १५ ऑगस्टपर्यंत ४जी, ५जी नेटवर्क लॉंच केले जाऊ शकते. याबाबत एका कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी कन्व्हर्जन्स इंडिया इव्हेंटमध्ये या कार्यक्रमात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT) चे कार्यकारी संचालक राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, कंसोर्टियमने सुमारे २,२९०,०७ (USD ३०) दशलक्ष खर्चून हे तंत्रज्ञान स्वदेशी विकसित केले आहे, तर जागतिक दूरसंचार कंपन्या या दिग्गज तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतात.

याबाबत लवकरच एक चांगली बातमी समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वदेशी ४G आणि ५G नेटवर्कवरील काम पूर्णत्वाच्या जवळ आहे आणि लवकरच बीएसएनएल कंपनी नेटवर्कमध्ये काम करण्यास सुरू करणार आहे. जे केवळ ४G नाही तर ५G NSA (नॉन-स्टँडअलोन ऍक्सेस) देखील असेल. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ते सादर होणार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

त्याचवेळी बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांनीही एका कार्यक्रमात सांगितले होते की, बीएसएनएलने १५ ऑगस्टपर्यंत ४जी सेवा सुरू करावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्याच बरोबर, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीने देशातील खाजगी दूरसंचार ऑपरेटर्सच्या बरोबरीने ५जी सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलला स्पेक्ट्रम वाटप करण्यात यावे. अशी शिफारस करण्यात आली.

या कारणामुळे ४जी सेवा सुरू होत नव्हती

बीएसएनएल ४जी नेटवर्कसाठी TCS-नेतृत्वाखालील कन्सोर्टियमसह चाचण्या घेत आहे ज्यात तंत्रज्ञान भागीदार म्हणून C-DOT चा समावेश आहे. यावेळी उपाध्याय यांनी सांगितले की ही संघटना टीसीएसच्या नेतृत्वाखाली आहे जी स्वतःच एक सॉफ्टवेअर शक्ती आहे. तर सुरुवातीला हार्डवेअरमुळे ४जी सेवा सुरू करण्यास आली नव्हती. मात्र ४जी कोर पूर्णपणे आता वर्चुअलाइज्ड बनले आहे. यामुळे ४जी व ५जी सेवा सुरू होणार आहे.

४G नेटवर्कसाठी लागणार ४५,००० कोटी

बीएसएनएलची ४जी नेटवर्क सुरू करण्यासाठी सरकारने ४५,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच उपाध्याय यांनी सांगितले आहे की, C-DOT आता त्यांचे तंत्रज्ञान विकास तपशील भारतीय कंपन्यांसाठी उघडत आहे आणि ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्टार्ट-अप्सना निधी देण्यात येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigenous 4g and 5g service of bsnl starting from august 15 know full details scsm
First published on: 24-03-2022 at 17:52 IST