scorecardresearch

INFINIX HOT 20 5G स्मार्टफोनची चाचणी, JIO TRUE 5G नेटवर्कवर दिली जबरदस्त स्पीड, खरेदी करण्यापूर्वी निकाल पाहाच

इन्फिनिक्सने अलीकडेच आपले दोन नवीन ५ जी स्मार्टफोन Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G परवडणाऱ्या किंमतीमध्ये लाँच केले आहेत. Infinix Hot 20 5G या स्मार्टफोनची ५ जी चाचणी घेण्यात आली आहे.

INFINIX HOT 20 5G स्मार्टफोनची चाचणी, JIO TRUE 5G नेटवर्कवर दिली जबरदस्त स्पीड, खरेदी करण्यापूर्वी निकाल पाहाच
(pic credit – indian express/jansatta)

Infinix Hot 20 5G tested with jio true 5g : इन्फिनिक्सने अलीकडेच आपले दोन नवीन ५ जी स्मार्टफोन Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G परवडणाऱ्या किंमतीमध्ये लाँच केले आहेत. Infinix Hot 20 5G या स्मार्टफोनची ५ जी चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीसाठी कंपनीला रिलायन्स जिओचे सहयोग लाभले असून विविध तपासण्यांमध्ये फोनचे मुल्यमापन करण्यात आले.

चाचण्यांमध्ये Infinix Hot 20 5G हा स्मार्टफोन जिओ ट्रू ५ जी नेटवर्कवर १.२ जीबीपीएस नेटवर्क स्पीड देऊ शकतो, अशी पुष्टी झाली आहे. या फोनसह इन्फिनिक्स जिओ ५ जी, नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी हे फोन देखील जिओच्या ५ जी नेटवर्कशी सुसंगत असतील.

(३० वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता पहिला SMS, काय लिहिले होते? जाणून घ्या)

फीचर्स

Infinix Hot 20 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच फूल एचडी प्लस गेमिंग डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ एनएम डायमेन्सिटी ८१० एसओसी, ४ जीबी रॅम (३ जीबी व्हर्च्युअल रॅम) आणि ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळते जी १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ५० एमपी ड्युअल रिअर कॅमेरा स्टेअप देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी मिळत असून, ती १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ९ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर ११ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

INFINIX ZERO 5G 2023 सादर; 8 जीबी रॅमसह अनेक फीचर्स

Infinix Zero 5G 2023 स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच फूल एचडी प्लस आयपीएस स्क्रीन मिळत असून त्यात एआरएम माली जी ६८ एमसी ४ जीपीयूसह मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० ५ जी एमओसी प्रोसेसर देण्यात आले आहे. फोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत कंपनीच्या एक्सओएस १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

(‘KIA INDIA’चे इन्स्टाग्राम खाते हॅक झाले, हॅकरने पोस्ट केला व्हिडिओ)

इन्फिनिक्स झिरो ५ जी २०२३ स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली आहे जी इंटरनल स्टोअरेजच्या सहायाने ५ जीबी पर्यंत अजून वाढवता येऊ शकते. फोनमध्ये २५६ जीबी स्टोअरेज देण्यात आली आहे जी मायक्रो एसडी कार्डच्या सहायाने वाढवता येऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:01 IST

संबंधित बातम्या