Flipkart Big Billion Days सेल यावेळी २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कॅटगरीच्या प्रोडक्टवर डिस्काउंट दिलं जातं आह. फ्लिपकार्टने स्मार्टफोनशी संबंधित डील्सची माहिती देणे सुरू केले आहे. जर तुमचे बजेट कमी असेल किंवा तुम्हाला पहिल्यांदाच स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही Infinix Smart 6 आणि Infinix Smart 6 HD खरेदी करू शकता. Infinix Smart 6 HD ला Flipkart वर ‘सर्वात स्वस्त स्मार्टफोन’ म्हणून टॅग केले गेले आहे. सेलमध्ये हे स्मार्टफोन कोणत्या किंमतीला खरेदी केले जाऊ शकतात हे जाणून घेऊया…

या सेलसाठी फ्लिपकार्टने अॅक्सिस बँक आणि ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे. सेलमध्ये या दोन्ही कार्ड्ससह खरेदीवर १० टक्के झटपट सूट मिळेल. याशिवाय एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय, स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन आणि फ्लिपकार्ट पे लेटर सारखे फायदेही मिळतील.

आणखी वाचा : ‘या’ तारखेपासून सुरू होतोय Flipkart Big Billion Days सेल; टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट

Infinix Smart 6 Specifications
Infinix Smart 6 स्मार्टफोनमध्ये २ GB रॅम आणि ६४ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६.६ इंच HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सेल प्रायमरी आणि डेप्थ लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला चार्ज करण्यासाठी Infinix 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेट MediaTek Helio A22 प्रोसेसरसह येतो. हा फोन ड्युअल सिम पोर्टला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 11 आधारित XOS 7.6 स्किनसह येतो आणि त्यात फेस, फिंगरप्रिंट अनलॉक सारखे फीचर देखील आहे.

आणखी वाचा : 5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स

Infinix Smart 6 HD Specifications
Infinix Smart 6 HD स्मार्टफोनमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६.६ इंच HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh लिथियम-पॉलिमर बॅटरी आहे. Infinix चा हा फोन MediaTek Helio A22 प्रोसेसर सह येतो. फोनमध्ये Android 11 Go Edition आधारित XOS 7.6 स्किन देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये फेस अनलॉक फीचर, ड्युअल VoLTE, 2GB व्हर्च्युअल रॅम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.