सध्या तरुणाईत ‘इन्स्टाग्राम’ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. ही तरुणाई आयुष्यातील चांगल्या, वाईट घटनांचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तरुणांबरोबर अनेक बडे कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही इन्स्टाग्रामचा व्यावसायिक वापर करतात. त्यामुळे त्यांना इन्स्टाच्या लाईक्स, व्हूज यांच्यासह पोस्टखालील कमेंट्स देखील महत्त्वाच्या असतात. या कमेंट्समार्फत त्यांची पोस्ट इतरांना आवडली का नाही हे समजते. याच कमेंट्सद्वारे यूजर्सना आपल्या इन्स्टा अकाऊंटकडे आकर्षित करता येऊ शकते. यासाठी पिन (PIN) हा एक बेस्ट ऑप्शन आहे असे मानले जाते. या ऑप्शनच्या माध्यमातून एखादी आकर्षक कमेंट पिन करुन त्याचा फायदा व्ह्यूज आणि सोशल मीडिया एन्गेजमेंटसाठी करता येऊ शकतो.

इन्स्टाग्राम रिलमधील कमेंट पिन करण्यासाठी खालील स्टेप्स करा फॉलो करा

  • इन्स्टाग्राम अ‍ॅप सुरु करा. उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये असलेल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करुन प्रोफाइलवर जा.
  • रिल सेक्शनमधील निवडलेल्या रिलवर जा आणि कमेंट्स ऑप्शनवर क्लिक करा.
  • जी कमेंट पिन करायची आहे, तिच्यावर काही सेंकद क्लिक करा. तेथे पिनचे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्याने ती कमेंट पिन होईल.
  • जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर क्लिक करण्याऐवजी कमेंट स्वाईप करा.
    (कमेंट अनपिन करण्यासाठी पुन्हा याच स्टेप्स पुन्हा वापरा. इन्स्टाग्रामवरील कोणत्याही रिलवर ३ कमेंट्स पिन करता येतात. )

इन्स्टाग्राम लाइव्हमधील कमेंट पिन करण्यासाठी खालील स्टेप्स करा फॉलो करा

  • इन्स्टाग्राम अ‍ॅप सुरु करा. त्यात मध्यभागी क्रिएट (create +) हे ऑप्शन दिसेल. (जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर हे ऑप्शन वर दिसेल)
  • त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या फोनची गॅलरी दिसेल. तेव्हा गॅलरीच्या ऑप्शनवरुन लाइव्हच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तेथे बाजूला टायटल लिहिलेले दिसेल, यामध्ये लाइव्हबद्दल थोडक्यात लिहून त्याची माहिती देऊ शकता. तुम्ही ऑडियन्सदेखील निवडू शकता.
  • आता लाइव्हवर क्लिक केल्यावर इन्स्टाग्राम लाइव्ह सुरु होईल.
  • त्यावर कमेंट्स यायला लागतील. आलेल्या कमेंट्सपैकी निवडलेल्या कमेेंटवर काही सेकंद क्लिक करा.
  • पुढे तेथे पिन असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक केल्याने ती कमेंट पिन होईल.

(कमेंट अनपिन करण्यासाठी त्यावर क्लिक करा. तेथे अनपिन हे ऑप्शन येईल. तुम्ही स्वत: कमेंट करुन ती कमेंट सुद्धा पिन करु शकता. इन्स्टाग्राम लाइव्हची सेवा फक्त मोबाईल फोन्सवर उपलब्ध आहे. संगणकावर लाइव्ह करणे सध्या अशक्य आहे.)

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

इन्स्टाग्रामच्या पोस्टमधील कमेंट पिन करण्यासाठी खालील स्टेप्स करा फॉलो करा

  • इन्स्टाग्राम अ‍ॅप सुरु करा. उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये असलेल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा
  • प्रोफाइलवर गेल्यावर निवडलेल्या फोटोवर क्लिक करा आणि पुढे कमेंट बॉक्स उघडा.
  • त्यानंतर ठराविक कमेंटवर काही सेंकद क्लिक करुन ठेवा. तेथे पिन हे ऑप्शन येईल.
  • त्यावर क्लिक केल्यावर ती कमेंट वर जाऊन पिन होईल.
  • आयफोनमध्ये कमेंट पिन करण्यासाठी राईट स्वाइपच्या ऑप्शनची मदत घेऊ शकता.
    (तेथे पुन्हा क्लिक केल्यावर अनपिन हे ऑप्शन दिसेल.)

जर तुम्हाला इन्स्टाग्राम प्रोफाइलवर एखादी पोस्ट पिन करायची असेल, तर त्या पोस्टच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. तेथे पिन टू प्रोफाइल असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही ती पोस्ट प्रोफाइलवर पिन करु शकता. सध्या फक्त तीन पोस्ट पिन करता येतात