इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हॉइस, व्हिडीओ कॉल्स करू शकतो. फोटो व्हिडीओ शेअर करून शकता. तसेच इंस्टाग्रामवरील रिल्स पाहणे व रिल्स तयार करणे याची क्रेझ सध्या वाढतच चालली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामने आपल्या वापकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणले आहे. डायनॅमिक प्रोफाइल फोटो असे हे फिचर आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते त्यांचा फोटो आणि डिजिटल अवतार प्रोफाइल फोटो म्हणून दाखवू शकणार आहते. वापरकर्त्याच्या प्रोफाईलला भेट देणारे वापरकर्ते दोन्हीमध्ये फ्लिप करू शकणार आहेत.

हेही वाचा : ५ हजार mAh बॅटरी आणि तगड्या स्टोरेजसह लाँच झाला Tecno Spark Go 2023; जाणून घ्या फीचर्स

हे फिचर कसे डाउनलोड कराल ?

Step-1. इंस्टाग्राममध्ये तुमचा प्रोफाइल फोटो तयार करणे किंवा एडिट करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः तुमच्या फोनवर इंस्टाग्राम उघडावे लागेल.

Step-2. इंस्टाग्राम ओपन केले की, तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लीक करावे लागेल.

Step-3. त्यानंतर तुमची प्रोफाइल एडिट करा व नंतर तुमचा अवतार तयार करण्यासाठी क्लीक करा.

Step-4. हे झाले की तुम्ही तुमच्या अवताराची स्किन टोन निवडू शकता.

Step-5 यानंतर अवतार सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटणवर क्लिक करा.

हेही वाचा : Outlook सह Microsoft च्या अनेक सेवा ठप्प; युजर्सना होतेय मोठी अडचण

जर तुम्ही तुमचा अवतार फेसबुकवर आधीच क्रिएट केला असेल तर तोच अवतार तुम्ही इंस्टाग्रामवर देखील वापरू शकता. तुम्हाला तुमचा अवतार एडिट करायचा असल्यास तुमच्या प्रोफाईलवर जाऊन ते कधीही करू शकता. यासाठी तुम्हाला एडिट प्रोफाईलवर क्लिक करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instagram has introduced a new feature for profile photos tmb 01
First published on: 25-01-2023 at 18:23 IST