scorecardresearch

३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 13! लवकरच घरी आणा तुमच्या स्वप्नातला फोन

जर तुम्ही आयफोन १३ खरेदी करण्यासाठी आयफोन १४ लाँच होण्याची वाट पाहत असाल तर आता तुम्हाला त्याची किंमत कमी होण्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. ३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही iPhone 13 घरी आणू शकता.

३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 13! लवकरच घरी आणा तुमच्या स्वप्नातला फोन
३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 13(photo: financial express)

iPhone 13 Croma Independence Day Offer: ॲप्पलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवीन सीरीज, iPhone १४ येत्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच होणार आहे. हा नवीन फोन खरेदी करण्यासाठी बरेच लोक लाँचची वाट पाहत आहेत. तर अनेक लोक नवीन आयफोन १४ लाँच नंतर आयफोन १३ ची किंमत कमी होईल या आशेने आयफोन १४ च्या लाँचची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही यातील एक असाल, आणि तुम्हालाही आयफोन १३ खरेदी करायचा आहे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही iPhone १३ चा १२८जीबी वेरिएंट सध्या ३ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन येऊ शकता. ही ऑफर अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर नाहीये. या ऑफरचा लाभ कोठून आणि कसा घ्यायचा ते जाणून घ्या.

येथून खरेदी करा iPhone 13

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या प्लॅटफॉर्मबद्दल बोलत आहोत तो अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नाहीये. तर हा स्मार्टफोन तुम्ही क्रोमावरून खरेदी करू शकता. क्रोमावर स्वातंत्र्यदिनी एक सेल सुरू आहे, ज्याचे नाव आहे क्रोमा इंडिपेंडन्स डे सेल. या सेलमध्ये १२८जीबी iPhone १३ ७९,९०० रुपयांऐवजी ११% च्या डिस्काउंटनंतर ७०,९९०- रुपयांना विकला जात आहे.

( हे ही वाचा: २७ दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह फक्त १८८ रुपयांना मिळतोय नोकियाचा 4G फोन; कसे ते जाणून घ्या)

३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत असा खरेदी करा आयफोन

हा स्मार्टफोन ३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी नेण्यासाठी तुम्हाला नो-कॉस्ट EMI चा पर्याय स्वीकारावा लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही आयफोन १३ साठी Qik EMI कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही त्याची संपूर्ण किंमत २९५८ रुपये प्रति महिना देऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही किंमत २४ महिन्यांत मोजावी लागेल.

Qik EMI कार्ड म्हणजे काय

Qik EMI कार्ड म्हणजे काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दल सर्व काही येथे जाणून घ्या. तुम्ही टाटाच्या नवीन पेमेंट अॅप, Tata Neu अॅपद्वारे Qik EMI कार्डसाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला १० हजार ते २ लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा दिली जाते आणि हे एक ईएमआय क्रेडिट कार्ड आहे. या कार्डच्या मदतीने तुम्ही क्रोमा वरून iPhone १३ चा EMI भरू शकता.

( हे ही वाचा: iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट)

iPhone 13 ची वैशिष्ट्ये

या डीलमध्ये iPhone १३ च्या १२८जीबी स्टोरेज वेरिएंटची चर्चा आहे जी A15 Bionic चिपवर काम करते. 5G सेवेसह हा iPhone 13 ६.१ इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे तर, याच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये दिलेले दोन्ही सेन्सर १२एमपीचे आहेत आणि फ्रंट कॅमेरा देखील १२ एमपीचा आहे. ड्युअल सिम सेवा असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला एक वर्षाची ब्रँड वॉरंटी देखील दिली जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iphone 13 is available for less than 3 thousand rupees bring home your dream phone soon gps

ताज्या बातम्या