iPhone 17 pro: अॅपलचा प्रिमियम आयफोन १७ प्रो खूपच लोकप्रिय झाला आहे. त्यातही तुमचं बजेट जास्त असेल तर हा आयफोन म्हणजे उत्तम पर्याय आहे. अगदी वेगळ्या आणि आकर्षक रंगामुळे आणि नवीन कॅमेरा सिस्टिममुळे आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स आकर्षक ठरले आहेत. असं असताना हा नवीन आयफोन अद्याप ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध नाही. तेव्हा काही बँका यावर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आयफोन १७ प्रोवर मोठ्या सवलती देत आहेत.
दिवाळीच्या खरेदीचा हंगाम संपला असला तरी, विजय सेल्स आता भागीदार बँकांकडून १० हजार रूपयांपर्यंतची सूट देत आहे. काही महिन्यांपूर्वी आयफोन १६ प्रो मॅक्सवर देण्यात आलेल्या मोठ्या सवलतींइतक्या या ऑफर महत्त्वाच्या नसल्या तरी किमतीतील कपात अनेक ग्राहकांना आकर्षित करत आहे.
- आयफोन १७ प्रोची सुरूवातीची किंमत २५६ जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत १,३४,९०० पासून सुरू होते. हा फोन डीप ब्लू, कॉस्मिक ऑरेंज आणि सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे. विविध बँकांच्या क्रेडिट कार्डसह हे डिव्हाइस सवलतीत उपलब्ध आहे.
- आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर ५००० रूपयांची सूट दिली जात आहे.
- एसबीआय बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या क्रेडिटद्वारे नो-कॉस्ट ईएमआय व्यवहार निवडल्यास ४००० रूपयांची सूट मिळू शकते.
- आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे आयफोन १७ प्रो खरेदी केल्यास ५ टक्के म्हणजेच १० हजारांपर्यंत सूट मिळेल.
- जर तुमच्याकडे संबंधित बँक कार्ड असतील, तर तुम्ही आता आयफोन १७ प्रो १,२४,९९० मध्ये खरेदी करू शकता. शिवाय, जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पर्याय निवडलात किंवा तुमचा जुना फोन थर्ड पार्टी रिसेलरद्वारे विकलात तर तुम्ही तुमची एकूण किंमत आणखी कमी करू शकता.
हेही वाचा
जुन्या आयफोन मॉडेल्सवरही सूट
- जर बँकेच्या सवलतीनंतरही आयफोन १७ प्रो तुमच्या बजेटच्या बाहेर असेल, तर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत जुने आयफोन मॉडेल खरेदी करण्याचा विचार करू शकता.
- आयफोन १५, १२८ जीबी आता २८ टक्क्यांच्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. त्याची एमआरपी ६९,९०० होती, आता ती फक्त ४९,९९९ मध्ये खरेदी करता येईल.
- आयफोन १६ आता फ्लिपकार्टवर फक्त ६९,९९९ मध्ये उपलब्ध आहे. प्रो मॉडेलची वैशिष्ट्ये हवी असलेल्या वापरकर्त्यांसाठी आयफोन १६ प्रो १ लाखात उपलब्ध आहे.