१ ऑक्टोबर रोजी 5G सेवा भारतात अधिकृत केली जाईल. दिवाळीच्या दिवशी, भारतीय मोबाइल वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क वापरण्यास सक्षम असतील आणि ते सुपर फास्ट 5G इंटरनेट चालवण्यास सक्षम असतील. रिलायन्स जिओ प्रथम 5G सेवा सुरू करू शकते. त्याच वेळी, Jio 5G रोलआउटच्या आधी, Jio 5G फोनची किंमत देखील समोर आली आहे. Jio 5G स्मार्टफोनची किंमत ८००० रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Jio 5G फोनची किंमत

Jio Phone 5G च्या किमतीची माहिती काउंटरपॉइंट्सच्या अहवालातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचा 5G स्मार्टफोन भारतात ८००० ते १२००० रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. ही किंमत श्रेणी पाहता, असाही अंदाज वर्तवला जात आहे की Jio Phone 5G बाजारात एकापेक्षा जास्त व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

( हे ही वाचा: २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Nokia 4G फोन; मिळेल २७ दिवसांचा बॅटरी बॅकअप)

Reliance Jio 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी, कंपनी आपल्या 4G ग्राहकांना 5G नेटवर्कवर आणण्यासाठी काम करेल आणि मोठा 5G वापरकर्ता आधार तयार झाल्यानंतरच त्याचा 5G फोन बाजारात लाँच होईल. विशेष म्हणजे, रिलायन्स एजीएम 2022 मध्ये, मुकेश अंबानी यांनी आधीच घोषणा केली आहे की कंपनी Google च्या सहकार्याने एक अल्ट्रा-परवडणारा 5G फोन लाँच करेल.

Jio 5G स्मार्टफोन

अहवालानुसार, २०२४ पर्यंत, Reliance Jio कमी किमतीत परवडणारा 5G mmWave + sub-6GHz स्मार्टफोन देखील लॉन्च करू शकते. हा मोबाइल फोन भारतातील कमी बजेटच्या 5G स्मार्टफोन्सपेक्षा अधिक आणि चांगल्या 5G बँडला सपोर्ट करेल आणि कमी विलंबता आणि स्मूथ 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात सक्षम असेल. मात्र, बाजारात येण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागू शकतो.

( हे ही वाचा: आता बंद पडलेल्या, तुटलेल्या फोनच्या बदल्यात मिळणार २००० रुपये! जिओची जबरदस्त ऑफर)

Jio Phone 5G Specifications

लीक्सनुसार, JioPhone 5G मध्ये १६०० x ७२० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो IPS LCD पॅनेलवर तयार केला जाईल. फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेट पाहता येतो आणि स्क्रीनला ग्लास प्रोटेक्शन देखील दिले जाऊ शकते. लीक्सनुसार, JioPhone 5G चा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असेल. Jio Phone 5G बद्दल सांगितले जात आहे की हा स्मार्टफोन ४जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल, ज्यामध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाईल.

प्रगती OS JioPhone 5G मध्ये दिली जाऊ शकते जी आपण JioPhone Next मध्ये पाहिली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगलने खासकरून भारतीय मोबाइल वापरकर्त्यांसाठी तयार केली आहे, ज्यामध्ये भारतीय भाषांनाही सपोर्ट आहे. त्याच वेळी, प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट दिला जाऊ शकतो.

( हे ही वाचा: २४ ऑक्टोबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये बंद होईल WhatsApp सपोर्ट; पूर्ण लिस्ट येथे पाहा)

फोटोग्राफीसाठी JioPhone 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरे देण्याची चर्चा समोर आली आहे. लीक्सनुसार, हा 5G फोन २ मेगापिक्सलच्या दुय्यम लेन्ससह १३ मेगापिक्सलच्या प्राथमिक सेन्सरला सपोर्ट करेल. हा दुय्यम सेन्सर मॅक्रो लेन्स असू शकतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.