रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे आणि ती आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रीपेड आणि पोस्टपेड योजना ऑफर करते. जर तुम्हाला दर महिन्याला रिचार्जच्या त्रासापासून मुक्ती मिळवायची असेल, तर कंपनी असे काही प्लॅन ऑफर करते ज्यांची वैधता एक वर्ष म्हणजेच ३६५ दिवस असते. या प्लान्समुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. जिओच्या या प्लान्समध्ये २०० रूपयांच्या खर्चात संपूर्ण वर्ष म्हणजे ३६५ दिवस फ्री कॉलिंग करू शकता.

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

जिओचा २,८७९ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. दरमहिन्याचा खर्च पाहिल्यास तुम्हाला महिन्याला २३९.९ रुपये खर्च येईल. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ७३० जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

जिओचा ३,११९ रुपयांचा प्लान

जिओच्या ३,११९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त १० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये महिन्याला २५९.९ रुपये खर्च येतो. तसेच, १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन, दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो.

महिन्याला २०० रूपयांचा प्लान
जर तुम्ही मासिक रिचार्ज म्हणून पाहिले तर एक प्रकारे तुम्ही दरमहा सुमारे २०० रुपये खर्च कराल. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. तसेच, दररोज १०० एसएमएस उपलब्ध होतील. तसेच, जिओच्या या प्लॅनमध्ये अॅप्सचा मोफत प्रवेश मिळेल.

रिलायन्स जिओचा २,९९९ रुपयांचा प्लान

जिओच्या २,९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये महिन्याचा खर्च २४९.९ रुपये आहे. या प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

रिलायन्स जिओचा ४,१९९ रुपयांचा प्लान

जिओच्या ४,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात एकूण १,०९५ जीबी इतका डेटा मिळतो. या प्लानचा महिन्याचा खर्च ३४९.९ रुपये आहे. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.