scorecardresearch

Jio चा शानदार प्लॅन! १४९ रुपयांत दररोज १ GB डेटा आणि बरंच काही…

रिलायन्स जिओने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. पण यानंतरही अशा अनेक ऑफर्स आहेत, ज्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

Jio-Recharge-Plan
(फाइल फोटो)

रिलायन्स जिओने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. पण यानंतरही अशा अनेक ऑफर्स आहेत, ज्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या प्लॅनची ​​किंमत कमी असून वैधताही योग्य दिली जात आहे. याशिवाय जिओसाठी आणखी अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत. तुम्हीही रिचार्ज करणार असाल, तर तुमच्यासाठी अनेक योजना आहेत, ज्या तुमच्यासाठी अधिक चांगल्या असू शकतात. येथे सुमारे १५० रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती देत आहोत.

जिओचा १४९ रुपयांचा प्लॅन
जर तुम्हाला कमी वैधता असलेला प्लान घ्यायचा असेल, तर Jio च्या १४९ रुपयांच्या प्लॅनला २० दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज १ GB डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला २० दिवस सतत १ GB डेटा दिला जाईल. यासोबतच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. त्याच वेळी, या प्लॅनसह अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio अ‍ॅप्सचा प्रवेश देखील दिला जातो.

आणखी वाचा : याच महिन्यात लॉंच होऊ शकतात Vivo V23 Pro, OnePlus 9RT, Xiaomi 11T Pro सारखे फोन, जाणून घ्या सविस्तर

१५२ रुपयांचा जिओ प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता दिली जात आहे. हा प्लॅन १५२ रुपयांना खरेदी करता येईल. जर तुम्ही हा प्लान घेतला तर यामध्ये दररोज ०.५ GB डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी १४ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि एकूण ३०० एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनसह Jio अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही मोफत दिला जात आहे.

आणखी वाचा : Micromax In Note 2 झाला लॉन्च, ४८ MP कॅमेर्‍यासह मिळतील हे फिचर्स

१७९ रुपयांचा प्लॅन
त्याचप्रमाणे, जर तुम्हाला १७९ रुपयांचा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यात २४ दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण २४ जीबी डेटा मिळेल. म्हणजेच, जर आपण प्रत्येक दिवसाबद्दल बोललो, तर दररोज १ GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचं झाल्यास, या प्लॅनमध्ये Jio अ‍ॅप्सचा प्रवेश देखील उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jio is offering 1gb data per day and much more in the plan of rs 149 prp