मुकेश अंबानींची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने , आपल्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या आधारे सुरुवातीपासूनच बाजारात जबरदस्त पकड ठेवली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत जे कमी किमतीत अधिक लाभांसह उपलब्ध आहेत. वास्तविक, जिओने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आणि जिओ फोन वापरकर्त्यांसाठी रिचार्ज योजना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. ज्यामुळे वापरकर्त्यांना स्वतःसाठी योग्य योजना निवडणे सोपे जाते. जर तुम्ही जिओफोन वापरकर्ते असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका प्लानबद्दल माहिती देणार आहोत ज्याची किंमत फक्त २६ रुपये आहे आणि त्यात अनेक फायदे देखील दिले आहेत. चला जाणून घेऊया जिओच्या या स्वस्त रिचार्जबद्दल.

जिओफोन (JioPhone) स्वस्त योजना

जर तुम्ही जिओफोन वापरत असाल आणि जिओच्या स्वस्त रिचार्जच्या शोधात असाल , तर आम्ही तुम्हाला जिओच्या नवीन स्वस्त अशा २६ रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. २६ रुपयांचा जिओ रिचार्ज २८ दिवसांच्या संपूर्ण वैधतेसह आणि २ जीबी डेटासह येतो. मात्र , ह्या प्लॅनचा फायदा फक्त जिओफोन वापरकर्ते घेऊ शकतात. इतर स्मार्टफोन धारकांना याचा फायदा घेता येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिओच्या २६ रुपये प्लॅनचे फायदे

कंपनीने या प्लानचा समावेश जिओफोन अ‍ॅड ऑन रिचार्जच्या यादीतील प्लॅन्समध्ये केला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वैधता आणि डेटासोबत एसएमएस अतवा कॉलची सेवा दिली जाणार नाही. वापरकर्त्यांना या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी जिओच्या साईटवर किंवा माय जिओ अ‍ॅपवरुन रिचार्ज करता येऊ शकते.