Tips Before Buying Laptop : लॅपटॉप हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे तर ऑफिसची कामे, शिक्षण आणि गेमिंगसाठी देखील तो उपयुक्त आहे. अनेक कामे करू शकत असल्याने लॅपटॉपची मागणी वाढली आहे. आता तर बाजारात फोल्डेबल लॅपटॉप देखील उपलब्ध झाला आहे. असूसने अलीकडेच आपला फोल्डेबल लॅपटॉप लाँच केला आहे. लॅपटॉपमध्येही नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केला जात आहे. तो विकसित होत आहे. दरम्यान तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. अडचणींना तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया.

१) रॅम

लॅपटॉपची स्पीड ही रॅमवर अवलंबून असते. तुम्ही मल्टीटास्किंगसाठी लॅपटॉप घेत असाल तर ४ जीबी रॅम असेलेला लॅपटॉप घ्या. जर तुम्ही हाय एंड सॉफ्टवेअर जसे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरणार असाल किंवा गेम्स खेळणार असाल तर लॅपटॉप विना अडथळा चालण्यासाठी कमीत कमी ८ जीबी रॅम असेल याची खात्री करा.

(‘हे’ आहेत ५ स्वस्त 5G Smartphones; फास्ट चार्जिंग, ८ जीबी रॅमसह मिळतंय बरंच काही, पाहा लिस्ट)

२) जीपीयू

तुम्ही व्हिडिओ स्ट्रिमिंग करत असाल किंवा गेम्स खेळत असाल तर जीपीयू किंवा ग्राफिक्स कार्ड ते चांगल्या फ्रेम रेट्स आणि अति उच्च रेझॉल्युशनसह नेहमीपेक्षा अधिक तीक्ष्ण तपशीलांसह चालवण्यात मदत करेल. जीपीयू हाय एंड सॉफ्टवेअर जसे व्हिडिओ एडिटिंग किंवा ऑनलाइन स्ट्रिमिंग अप्लिकेशन चालवण्यातही मदत करते. तुम्हाला गेमिंग लॅपटॉप हवा असेल तर तुम्ही एनव्हिडिआ ग्राफिक्स कार्ड घेऊ शकता. चांगला गेमिंग अनुभव देण्यात ते मदत करू शकते.

३) डिस्प्ले

लॅपटॉप तुमच्याकडे ३ ते ४ वर्ष राहील, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार रेझॉल्युशन निवडा. ग्लॉसी आणि मॅट पर्यायासह अनेक स्क्रीन्स उपलब्ध आहेत. मात्र, लॅपटॉप घेताना फूल एचडी स्क्रीन (१९२०x१०८०) असेलेला लॅपटॉप घ्या.

(तुमच्या बजेटमध्ये बसतो का OnePlus 11 आणि OnePlus 11R? किंमतीबाबत खुलासा, जाणून घ्या)

४) सीपीयू

तुमची दैनंदिन कामे उत्तमरित्या पार पाडेल असे सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) निवडा. बाजारात कोअर आय ३, कोअर आय ५, कोअर आय ७ आणि कोअर आय ९ उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार तुम्ही थ्रेड्स, जनरेशन आणि प्रोसेसरचे कोअर्स निवडू शकता.

५) बॅटरी लाइफ

लॅपटॉप हे कुठेही घेऊन जाता येते, मात्र त्याचे सर्व काही बॅटरीवर अवलंबून आहे. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल तर या पैलूचाही विचार केला पाहिजे. कंपनीने सांगितलेली बॅटरी लाइफ आणि वापरताना मिळणारी बॅटरी लाइफ यामध्ये भरपूर फरक असतो. म्हणून निर्मात्यांनी दिलेल्या नंबर ऑफ हवर्सऐवजी (mAh) वॅट हवर्स (Wh) आणि मिलिअ‍ॅम्पिअर हवर्समध्ये बॅटरी रेटिंग बघा.

(आवडत्या Stock पुढे ‘हे’ चिन्ह लावा आणि मिळवा संपूर्ण माहिती, गुंतवणूकदारांसाठी ट्विटरचे अनोखे फीचर)

6) स्टोअरेज

फोटो, व्हिडिओ, सॉफ्टवेअर्स, फाइल्स इत्यादी सेव्ह करण्यासाठी जास्त स्टोअरेज असणे गरजेचे आहे. लॅपटॉप घेताना तुमचे काम आणि आवश्यकता पाहून स्टोअरेज निवडा. तुमचे बजेट चांगले असल्यास एसएसडी निवडा.

७) पोर्ट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॅपटॉप घेताना त्याला किती यूएसबी पोर्ट्स, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आले आहेत हे तपासा. फोन, एक्सटर्नल स्टोअरेज जोडण्यासाठी पोर्टची गरज पडेल. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ते आवश्यक आहेत.