चीनी टेक कंपनी लेनोव्हाने भारतीय बाजारात आपला नवीन Android टॅबलेट ‘Lenovo Tab P11 Pro’ लाँच केला आहे. या टॅबलेट सीरिजमधील कंपनीचा हा तिसरा डिवाइस आहे. कंपनीनं याआधी बाजारात Lenovo Tab P11 आणि Lenovo Tab P11 Plus सादर केले आहेत. जाणून घेऊया या नवीन टॅबलेटची फीचर्स व स्पेसिफिकेशन्स…

टॅबलेटचे स्पेसिफिकेशन्स
Lenovo Tab P11 Pro मध्ये ११.२-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या टॅबलेटची स्क्रीन १२०हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते तसेच ६००निट्स ब्राइटनेस, एचडीआर१०+ आणि डॉल्बी व्हिजन एचडीआर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. या टॅबलेटमध्ये मागील वेरिएंटच्या तुलनेत बरेच अपग्रेड्स झाले आहेत. MediaTek Kompanio 1300T प्रोसेसर नवीन टॅबमध्ये उपलब्ध आहे.

बॅटरी

टॅब्लेटमध्ये ८२००mAh बॅटरी देखील आहे, जी 1st Gen च्या मॉडेलमध्ये आढळलेल्या ८४००mAh बॅटरी पॅकपेक्षा थोडी लहान आहे. लेनोवोचा दावा आहे की, टॅबलेट एका चार्जवर १४ तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतो. 

आणखी वाचा : Infinix Note 12 2023 लॉन्च; आकर्षक फीचर्सह मिळेल दमदार बॅटरी, किंमत फक्त…

कॅमेरा

टॅबमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. टॅबलेटमध्ये डॉल्बी ATMOSसपोर्टसह क्वाड-स्पीकर सेटअप देखील आहे. त्याचे वजन ४८० ग्रॅम आहे. टॅब P11 प्रो Android १२ वर चालतो.

किंमत
Lenovo Tab P11 Pro भारतात २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज पॅक करणाऱ्या ८जीबी रॅम पर्यायासह लाँच करण्यात आला आहे. टॅबलेटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. त्या तुलनेत, मूळ टॅब पी11 प्रो कंपनीच्या भारत वेबसाइटवर ३६,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. ग्राहक १७ ऑक्टोबरपासून Amazon.in आणि Lenovo Exclusive Store मधून Tab P11 Pro (2nd Gen) खरेदी करू शकतात.