scorecardresearch

‘हे’ अ‍ॅप सेल्फीला देते पेंटिंगसारखा लूक; कुठेही अपलोड केल्यावर व्हाल लोकप्रिय, असा करा वापर

सेल्फीला आकर्षक करण्यासाठी आपण विविध फिल्टर्स वापरतो, इन्स्टाग्राम किंवा इतर फोटो एडिटिंग अ‍ॅपचा वापर करतो. परंतु, अलीकडे एक अ‍ॅप व्हायरल झाले आहे. हे अ‍ॅप तुमच्या सेल्फीला कलाकृतीमध्ये रुपांतरीत करते.

‘हे’ अ‍ॅप सेल्फीला देते पेंटिंगसारखा लूक; कुठेही अपलोड केल्यावर व्हाल लोकप्रिय, असा करा वापर
(Image source: Shruti Dhapola via Lensa AI)

Lensa ai turn selfie into beautiful painting : सेल्फीला आकर्षक करण्यासाठी आपण विविध फिल्टर्स वापरतो, इन्स्टाग्राम किंवा इतर फोटो एडिटिंग अ‍ॅपचा वापर करतो. परंतु, अलीकडे prisma Lensa ai नावाचे अ‍ॅप व्हायरल झाले आहे. हे अ‍ॅप तुमच्या सेल्फीला कलाकृतीमध्ये रुपांतरीत करते. अ‍ॅपद्वारे सादर झालेल्या सेल्फी सुंदर आणि लक्षवेधक अशा पेटिंग स्वरुपात युजरला मिळतात. तुमच्या फोटोला हटके लूक या अ‍ॅपद्वारे मिळते. हे अ‍ॅप असे अफलातून फोटो कसे तयार करते? याबाबत जाणून घेऊया.

लेन्सा एआय हे प्रिझ्मा लॅबचे उत्पादन असून ते तुमच्या सेल्फीवर आधारीत भन्नाट अवतार तुमच्यासाठी तयार करते. यासाठी हे अ‍ॅप आर्टिफिशल इंटेलिजेन्सची मदत घेते. लेन्सा फोटोला पेंटिंगमध्ये रुपांतरित करते किंवा ते तुम्हाला कॉस्मिक लूकमध्ये देते, किंवा तुम्हाला फॅन्टसी लूक देते. विशेष म्हणजे, कोणतेही अवतार सारखे नसते. प्रत्येकवेळी अल्गोरिदम रन केल्यावर तुम्हाला अनोखे अवतार मिळतात. पण, लेन्सा कसे काम करते? आणि ते वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? याबाबत जाणून घेऊया.

(नवीनच लाँच झालेल्या ‘OnePlus TV Y1S Pro’वर मोठी सूट; ५५ इंच स्क्रीन, २३० लाइव्ह चॅनल्स, किमतही परवडणारी)

लेन्सा वापरण्यासाठी पेसे द्यावे लागतात

एआयद्वारे मॅजिक अवतार्स तयार करण्यासाठी प्रत्येकवेळी पैसे द्यावे लागतात. एआय सॉफ्टवेअरद्वारे छायाचित्र, व्हिडिओ, सेल्फी एडिट करण्यासाठी तुम्ही त्याचे फ्री व्हर्जन वापरू शकता. तुम्ही वर्षभरासाठीचे ४९९९ रुपयांचे वार्षिक सब्सक्रिप्शन घेऊ शकता. सध्या ५० टक्के सूट मिळत आहे. ज्यामुळे त्याची किंमत २४९९ रुपये झाली आहे. तुम्हाला एक आठवड्याचा मोफत ट्रायल देखील मिळतो.

काय आहेत हे अवतार्स?

अ‍ॅप उघडल्यानंतर मॅजिक अवतारचा पर्याय दिसेल त्यावर टॅप करा. टॅप केल्यावर तुम्हाला १० ते २० सेल्फी अपलोड करण्यासाठी विचारले जाईल, जेणेकरून एआय अल्गोरिदम अनोखे छायाचित्र तयार करेल. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सेल्फीमध्ये तुमचा चेहरा फोकसमध्ये असायला हवा. चेहरा अर्धा झाकलेला नसावा. चांगल्या छायाचित्रासाठी चेहऱ्यावर शार्प फोकस असणे गरजेचे आहे.

(..म्हणून कदाचित IPHONE 15 मध्ये USB TYPE C CHARGER मिळणार नाही)

फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमचे जेंडर (पुरुष किंवा स्त्री) निवडू शकता आणि नंतर अवतार तयार करण्यासाठी क्रिएटवर टॅप करा. या सेवेसाठी तुम्हाला पैसे मागितले जातील. पैसे दिल्यानंतर प्रक्रिया सुरू होते जी १५ मिनिटे चालते आणि नंतर अवतार तयार होतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:33 IST

संबंधित बातम्या