सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Amazon , Google, Meta , Microsoft यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे. आता या कंपन्यांमध्ये LinkedIn कंपनीचा देखील समावेश झाला आहे. LinkedIn कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

LinkedIn कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३.५ टक्के म्हणजेच ७१६ कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. तसेच कंपनी चीन-केंद्रित जॉब अ‍ॅप्लिकेशन देखील बंद करणार आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन आणि मागणीत झालेली घट यामुळे कंपनीने ही पाऊल उचलले आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मालकीची कंपनी आहे. लिंकडिनमध्ये सुमारे २०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कंपनीचा महसूल वाढला असला तरी लिंकडिन कंपनी कर्मचारी कपात केलेल्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.

हेही वाचा : Twitter युजर्ससाठी मोठी बातमी! लवकरच ‘ही’ अकाउंट्स होणार बंद, लॉग इन करा अन्यथा…

LinkedIn चे सीईओ रायन रोस्लान्स्की यांनी याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणाले, ”कंपनीचे कामकाज अधिक चांगले करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपनीला लवकर निर्णय घेण्यास मदत होईल.” कंपनीच्या सेल्स, ऑपरेशन अणि सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने २१,००० तर गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच Amazon , Meesho , Sharechat , Microsoft यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.