एलॉन मस्क यांनी २७ ऑक्टोबर रोजी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरबदल झाले आहेत. मस्क यांनी कंपनीतील काही उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली, ब्ल्यू टिकसाठी पैसे घेण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मोठी कर्मचारी कपात केली. यामुळे अनेक युजर्स संतापले असून ते इतर पर्याय शोधत आहेत. याचा लाभ ट्विटरला पर्यायी असलेल्या एका कंपनीला झाल्याचे समोर आले आहे.

इतके मिळाले युजर्स

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

गेल्या काही दिवसांमध्ये मास्टोडॉन या सोशल नेटवर्क संकेतस्थळाचे युजर इतके वाढले आहेत, की संकेतस्थळाच्या संस्थापकाला हा भार सांभाळणे कठीण झाले आहे. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर मास्टोडॉनला ४ लाख ८९ हजार ३ युजर्स मिळाले आसून यामुळे एकूण मासिक अ‍ॅक्टिव्ह युजर्सची संख्या १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. संकेतस्थळाचे संस्थापक, लीड डेव्हलपर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी युजेन रोचको यांनी सोमवारी आपल्या मास्टोडॉन खात्यावरून याबाबत माहिती दिली.

(वनप्लसच्या ‘या’ 2 स्मार्टफोनला मिळणार 5G सपोर्ट; कंपनीने जारी केला अपडेट)

ट्विटरच्या २३८ मिलियन दैनंदिन अ‍ॅक्टिव्ह युजर्सशी तुलना केली असता मास्टोडॉनला मिळालेला लाभ फार छोटा आहे. पण मस्क यांनी ट्विटर हातात घेतल्यानंतर मास्टोडॉनला याचा चांगला फायदा झाला आहे. तसेच यातून युजर्सची ट्विटरविरोधात असलेली नाराजी देखील दिसून येते.

मास्टोडॉनला इतका प्रतिसाद मिळाल्याचे मी कधीच बघितले नाही. सोशल मीडिया वेगळ्या पद्धतीने करता येतो हे पाहण्यासाठी लोकांसाठी ही उत्तम संधी आहे, असे रोचको यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते.

गुगलवर मास्टोडॉनच्या शोधात वाढ

मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर गुगलवर मास्टोडॉनच्या शोधात वाढ झाली होती. युरोपमध्ये हा शोध मोठ्या प्रमाणात सुरू होता. मास्टोडॉनही युरोपमधीलच आहे. युजर वाढल्याने संकेतस्थळावर ताण आला आहे आणि यामुळे काम वाढल्याचे रोचको यांचे म्हणणे आहे.

आपले काम गांभीर्याने घेतले जात आहे हे पाहताना आनंद वाटते. परंतु, हे सर्व हाताळण्यासाठी १२ ते १४ तास काम करावे लागले, असे रोचको यांनी म्हटले होते. प्रोसेसिंगमध्ये विलंब होत असल्याने रोचको यांनी युजर्सची माफी देखील मागितली होती. आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अकाउंटिंग, कस्टमर सपोर्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशन आणि इत्यादी कामे हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले होते. काही युजर्सनी संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर कन्फर्मेशनचा इमेल येत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

(अमेझॉनने लाँच केला स्वस्त वार्षिक प्लान; ५९९ रुपयांमध्ये काय मिळतंय? जाणून घ्या)

म्हणून मास्टोडॉनला पसंती?

सकेतस्थळांवर द्वेषयुक्त संभाषणे चालू देणार नाही ही मास्टोडॉनची वचनबद्धता कदाचित मस्क यांच्या मुक्त संभाषण उपक्रमाबद्दल चिंतीत झालेल्या युजर्सना आकर्षित करत असेल. मास्टोडॉन स्वतःला एक संघटित सोशल नेटवर्क म्हणतो. संकेतस्थळावर खात्यासाठी साइन अप करण्याऐवजी, वापरकर्ते सर्व्हरमध्ये समाविष्ट होतात. प्रत्येक सर्व्हर स्वतंत्र असतो, एखादी व्यक्ती किंवा संस्थेद्वारे तो होस्ट केला जातो आणि त्याचे स्वतःचे नियम असू शकतात.

मास्टोडॉनच्या स्थलांतराचा त्या संकेतस्थळावर किंवा ट्विटरवर कायमस्वरुपी परिणाम होईल की नाही, हे सांगता येणार नाही. मास्टोडॉनच्या गोंधळात टाकणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल ट्विटरवरही अनेक चर्चा सुरू आहेत. मस्क स्वतः या संकेतस्थळावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी मास्टोडॉनवर टीका देखील केली होती.