scorecardresearch

व्हॉट्सॲपमध्ये चॅटसाठी येणार AI चे भन्नाट फिचर! ‘या’ युजर्सना मिळणार फायदा…

मेटा कंपनी व्हॉट्सअपच्या युजर्ससाठी एआयचे (AI) एक खास फीचर घेऊन येत आहे.

Meta AI Chatbot Now Available to some whatsapp users with Amazing and useful features
(सौजन्य: लोकसत्ता.कॉम) व्हॉट्सॲपमध्ये चॅटसाठी येणार AI चे भन्नाट फिचर! 'या' युजर्सना मिळणार फायदा….

व्हॉट्सअप हे असे अ‍ॅप आहे की, जे तुम्हाला सगळ्याच लोकांच्या फोनमध्ये सहज दिसेल. भारतातच काय तर अगदी जगभरातील लोक हे अ‍ॅप वापरतात. व्हॉट्सअपही वापरकर्त्यांच्या सोईसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. आता व्हॉट्सअप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मेटा कंपनी व्हॉट्सअपच्या युजर्ससाठी एआयचे (AI) एक खास फीचर घेऊन येत आहे. काय आहे हे फीचर जाणून घेऊ.

मेटा कंपनी एआयचे मॉडेल आता व्हॉट्सॲप युजर्ससाठीही घेऊन येत आहे. मार्क झुकरबर्ग यांनी मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप मेटा कनेक्ट २०२३ (WhatsApp Meta Connect 2023) कार्यक्रमादरम्यान घोषणा केली की, व्हॉट्सॲपवर आम्ही आता ‘एआय चॅटबॉट’ (AI chatbot) हे फीचर घेऊन येत आहोत. चॅटबॉट सुरुवातीला युनायटेड स्टेट्समधील युजर्ससाठी उपलब्ध होते. पण, आता ॲण्ड्रॉइड युजर्ससाठी व्हॉट्सॲप बीटामध्ये लवकरच हे भन्नाट फीचर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Honor 90 to be available discounted price on amazon great indian festival sale
Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच
motorola annouce big discount on our smartphones in flipkart big billion days sale
Flipkart Big Billion Days 2023: मोटोरोलाच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार डिस्काउंट, ऑफर्स एकदा बघाच
reliance jio netflix basic postpaid plans
रिलायन्स जिओच्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सना मिळणार NetFlix चे सबस्क्रिप्शन, किंमत…
one plus pad go features revaled on 19 september
OnePlus ने उघड केले ‘या’ नवीन टॅबलेटचे डिझाइन; कधी होणार लॉन्च? जाणून घ्या

तुम्हाला ॲण्ड्रॉइड व्हर्जनसाठी व्हॉट्सॲपमध्ये एका वेगळा शॉर्टकट पाहायला मिळेल. युजरला नवीन चॅट सुरू करण्यासाठी एक वेगळा आयकॉन पाहायला मिळणार आहे. एआय चॅटबॉट हे चॅट्स (chat) विभागात तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला नवीन चॅट हा (New Chat) आयकॉन दिसेल. या आयकॉनच्या मदतीने एक नवीन शॉर्टकट तयार होईल आणि एआय चॅटमध्ये प्रवेश करणे सोपे जाईल. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्सना या नवीन टूलबाबत सहज माहिती मिळेल आणि अगदी सहजपणे याचा उपयोग करता येईल.

हेही वाचा…‘गूगल फोटोज’वर तुमचे खास जुने फोटो सेव्ह करायचेत? मग फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स…

सहलीची प्लॅनिंग, व्हॉट्सॲपसंबंधित प्रश्नाची उत्तरे, विशिष्ट कामाचे वेळापत्रक, ग्रुप चॅट, जोक्स आदी गोष्टींसाठी तुम्ही एआय चॅटबॉटचा वापर करू शकता. तसेच माहितीचा एक स्रोत म्हणून हे फीचर डिझाईन करण्यात आले आहे. नेमकी ही सुविधा कधी सुरू होईल ते कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही. जे लोक व्हॉट्सअपच्या बीटा प्रोग्रॅमचा भाग आहेत, ते सर्व या नव्या फीचरची टेस्टिंग करू शकतील. आतापर्यंत हे फीचर सुरुवातीला व्हॉट्सॲपच्या पब्लिक व्हर्जनमध्ये आलेले नाही,असे सांगण्यात येत आहे.मेटाचे एआय AI सहायक वापरकर्त्यांना इमॅजिन (imagine) कमांडचा वापर करून वास्तववादी दिसणार्‍या प्रतिमा तयार करण्यास परवानगी देईल. तसेच हे सर्व विनामूल्य उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटसह एआय कोलॅबोरेट केले आहे. आता लवकरच व्हॉट्सॲप युजर्ससाठी एआय चॅटबॉट (AI chatbot) हे फीचर घेऊन येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meta ai chatbot now available to some whatsapp users with amazing and useful features asp

First published on: 21-11-2023 at 14:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×