Mivi ने बुधवारी भारतात दोन नवीन साउंडबार लाँच केले. Mivi Fort S16 आणि Fort S24 पूर्णपणे भारतात बनवल्याचा दावा केला जातो. Mivi Forte S16 आणि Forte S24 हे पोर्टेबल साउंडबार आहेत जे १,२९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये ब्लूटूथ, ऑक्स आणि यूएसबी यांसारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स उपलब्ध आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, हे साउंडबार ६ तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतील. हे साउंडबार इनबिल्ट व्हॉईस असिस्टंट सपोर्टसह येतात.

Mivi Fort S16, Fort S24 price in India
Mivi Forte S16 साउंडबार बुधवारी लाँच ऑफर म्हणून १,२९९ रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला. फ्लिपकार्ट आणि अधिकृत Mivi वेबसाइटवरून याचा लाभ घेता येईल. गुरुवारपासून हा साउंडबार १,४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
Weather Forecast
भारतात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

आणखी वाचा : मेडिकल ग्रेड देणारी जगातील पहिली भन्नाट स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा काय आहे खास?

Fort S24 बद्दल बोलायचे झाले तर, ते Flipkart आणि Mivi च्या वेबसाइटवरून १,७९९ रूपयांमध्ये मिळवण्याची संधी आहे. Mivi Fort S24 साउंडबार गुरुवारी १,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होईल.

आणखी वाचा : वर्षभरासाठी रिचार्जची चिंता सोडा! एअरटेलच्या प्लॅनमध्ये ७३० GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री ऑफर्स

Mivi Fort S16, Fort S24 specifications
Mivi Fort S16 आणि Fort S24 साउंडबारमध्ये दोन पॅसिव्ह रेडिएटर्स आहेत जे स्टुडिओसारखी बेस क्वालिटी देतात. फोर्ट S16 एकूण १६ W चे RMS आउटपुट ऑफर करतो तर फोर्ट S24 साउंडबार २४W आउटपुट ऑफर करतो.

Mivi Fort S16 आणि Fort S24 साउंडबार AUX, USB आणि microSD कार्ड स्लॉट सारखे अनेक इनपुट ऑप्शन देतात. हे साउंडबार वायरलेस म्यूझिक स्ट्रिमिंगसाठी ब्लूटूथ ५.१ टेक्नॉलॉजी सपोर्टसह येतात. दोन्ही साउंडबारमध्ये २.० चॅनेल सिस्टम देण्यात आले आहेत.

कंपनीचे म्हणणे आहे की Mivi Fort S16 आणि Fort S24 साउंडबारमध्ये सहज प्रवेशासाठी इनबिल्ट व्हॉइस असिस्टंट मिळतात. हे साउंडबार सिरी आणि गुगल असिस्टंट सपोर्टसह येतात.

बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास, Mivi Fort S16 मध्ये २००० mAh बॅटरी आहे जी ६ तासांपर्यंत प्लेबॅक टाईम ऑफर करते. तसंच Mivi Fort S24 साउंडबारला चार्ज करण्यासाठी २५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. तथापि, Mivi चं म्हणणं आहे की, या साउंडबारला ६ तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देखील मिळेल.