scorecardresearch

Premium

New Year 2022: १ जानेवारी २०२२ पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे, नियम बदलणार

दरांमधील हा बदल १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. या नवीन नियमाबद्दल अधिक तपशील जाणून घ्या

ATMs rules will change
ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे (फोटो: Financial Express )

१ जानेवारीपासून बँक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर वाढलेले शुल्क लागू होईल. वाढीव शुल्काबाबत ग्राहकांना संबंधित बँकांकडून संदेश मिळत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जूनमध्ये घोषणा केली होती की देशातील बँकांना आता वापरकर्त्यांसाठी विनामूल्य मासिक मर्यादेपेक्षा जास्त रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. दरांमधील हा बदल १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल.

एटीएममधून पैसे काढणं महागणार

आरबीआयने एटीएममधून मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

(हे ही वाचा: Google Pay New Rule : १ जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार)

याशिवाय, मध्यवर्ती बँकेने बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये आणि सर्व केंद्रांमधील गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ५ रुपयांवरून ६ रुपये करण्याची परवानगी दिली होती. हे १ ऑगस्ट २०२१ पासून लागू झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New year 2022 from january 1 2022 more money will have to be paid to withdraw money from atms the rules will change ttg

First published on: 31-12-2021 at 13:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×