एचएमडी ग्लोबलच्या नोकिया ब्रँड ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नोकियाने आपला ‘Nokia G60 5G’ हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला आहे. नोकियाचा हा फोन 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सुसज्ज आहे. नोकिया G60 5G स्मार्टफोन अँड्रॉइड १२ वर काम करतो. तर हा स्मार्टफोन Snapdragon 695 या प्रोसेसर बाजारात उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकिया G60 5G फीचर्स
नोकिया G60 5G या स्मार्टफोनच्या लूक आणि डिझाईन बद्दल बोलायचे म्हटले, तर हा फोन नोकियाच्या जुन्या लूक ऐवजी फ्लॅट बॉडीसह तयार करण्यात आलेला आहे. या फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट, फुल-एचडी+ रिझोल्यूशन (१०८०×२४०० पिक्सेल), ४००nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ संरक्षणासह मोठा ६.५-इंच डिस्प्ले इत्यादी फीचर्स आहे.

नोकिया G60 5G बॅटरी

डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, ४,५००mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी २०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये ब्लूटूथ ५.१, ३.५ मिमी ऑडिओ जॅक पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय आहे. हा स्मार्टफोन बाजारामध्ये ब्लॅक आणि आइस कलर या दोन पर्यायासह उपलब्ध आहे.

आणखी वाचा : 50MP कॅमेरा असलेला ‘Huawei Nova Y61’ स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

नोकिया G60 5G कॅमेरा

नोकिया G60 5G या एस फोनमध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा दिलेला आहे. तर यामध्ये ५० मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर असून ५-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि २-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर मिळतो.

नोकिया G60 5G किंमत

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध असलेल्या या नोकिया G60 5G स्मार्टफोनला भारतामध्ये २९,९९९ रुपये लाँच केले गेले. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान या स्मार्टफोनसोबत नोकिया पॉवर इअरबड्स मोफत मिळेल, ज्याची किंमत ३,५९९ रुपये आहे. नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि प्रमुख रिटेल आउटलेट वर प्रि-बुकिंग सर्विस उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia g60 5g launched in india pdb
First published on: 01-11-2022 at 16:46 IST