scorecardresearch

आता गूगल सर्चमधून बुक करता येणार ट्रेनचे तिकीट? काय आहे नवीन फीचर जाणून घ्या

गूगलकडुन प्रवासासंदर्भात एक नवे फिचर लाँच करण्यात आले आहे, हे फीचर कसे वापरता येईल जाणून घ्या.

आता गूगल सर्चमधून बुक करता येणार ट्रेनचे तिकीट? काय आहे नवीन फीचर जाणून घ्या
(Photo : प्रातिनिधिक, Reuters)

आपण कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी लगेच गूगलची मदत घेतो. यामुळे आता आपण गूगलवर इतके अवलंबून असतो की छोट्यातल्या छोट्या गोष्टीची देखील आधी गूगल कडुन खात्री करून घेतो. गूगलमुळे आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती लगेच मिळते. पण आता फक्त माहितीपर्यंत मर्यादित न राहता गूगल आपला प्रवासही सुखकर करण्याच्या तयारीत आहे. गूगलकडुन प्रवासासंदर्भात एक नवे फीचर लाँच करण्यात आले आहे, काय आहे हे फीचर जाणून घेऊया.

गूगलने एक नवीन फीचर जाहीर केले आहे. यामुळे युजर्सना गूगल सर्चद्वारे ट्रेनचे तिकीट खरेदी करता येणार आहे. सध्या हे फीचर फक्त काही देशांमध्ये लॉन्च होणार आहे, परंतु कंपनीकडून त्याचा अधिक विस्तार करण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे.

आणखी वाचा : पार्किंगमध्ये गाडी शोधण्यासाठी गूगल करणार मदत! काय आहे हे फीचर जाणून घ्या

गूगलने सध्या जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानमधील युजर्सना आसपासच्या प्रवासासाठी थेट गूगल सर्चवर रेल्वे तिकीट खरेदी करण्याचा एक सोपा पर्याय दिला आहे. या फीचरमुळे प्रवास अधिक सुखकर होणार हे नक्की. ट्रॅव्हल टूल्समध्ये सस्टेनबिलिटीचा समावेश केला असल्याची माहिती, गूगलकडुन देण्यात आली. गुगलच्या ट्रॅव्हल प्रॉडक्ट्सचे व्हीपी रिचर्ड होल्डन म्हणाले, “काही ट्रिप्ससाठी, ट्रेनने जाणे हा पर्याय सोयीचा असु शकतो. परंतु एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी येणारा प्रवास खर्च आणि ट्रेनचे शेड्युल यांची माहिती मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी हे सर्च फीचर उपयोगी येईल.” एका ब्लॉग पोस्टद्वारे त्यांनी या सर्च फीचरबद्दल घोषणा केली, ‘आजपासून तुम्ही थेट गुगल सर्चवर ट्रेन तिकिट खरेदी करू शकता. विशेषतः जर्मनी, स्पेन, इटली आणि जपानमध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकता.’ असे त्यांनी जाहीर केले.

सर्वोत्तम ट्रेनचा पर्याय निवडा
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला फक्त सर्चमध्ये जागेचे नाव टाकायचे आहे. उदा. “बर्लिन ते व्हिएन्ना ट्रेन्स” असे सर्च करा. असे सर्च केल्याने एक नवीन मॉड्यूल दिसेल जे तुम्हाला तुमची प्रवासाची तारीख (Departure Date) निवडण्याचा पर्याय देईल. त्यामध्ये तुमच्यासाठी योग्य असलेली ट्रेन निवडा, त्यानंतर तुमचे बुकिंग पूर्ण करण्यासाठी पार्टनर असलेल्या वेबसाइटवरील थेट लिंक दिली जाते. त्यावरून बुकिंग पुर्ण करू शकता.

आणखी वाचा : व्हाट्सअ‍ॅपमधील ‘या’ सेटिंगमुळे होऊ शकतो फोन हॅक; लगेच करा बदल

बस तिकीटासाठी सुद्धा वापरता येणार हे फीचर
होल्डन म्हणाले, “आम्ही जसजसे रेल्वे सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी जोडले जाऊ तशी ही सुविधा अधिक ठिकाणी पसरेल. आम्ही लवकरच बस तिकिटांसाठी देखील अशीच सुविधा चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून प्रवाशांकडे इंटरसिटी प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील.”

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now you can book train tickets from google search know more about this new feature pns

ताज्या बातम्या