One Plus कंपनीचे स्मार्टफोन सध्या बाजारामध्ये लोकप्रिय स्मार्टफोन्स आहेत. वनप्लस एक प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स ज्यामध्ये फीचर्स आणि टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केलेला असतो असे फोन लॉन्च करत असते. आतासुद्धा लवकरच कंपनीचा OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोन उद्या (४ एप्रिल २०२३) लॉन्च होणार आहे .OnePlus Nord CE 3 Lite चा टिझर देखील कंपनीने सादर केला आहे. फोन कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे याची माहिती कंपनीने दिली आहे. या स्मार्टफोनसोबत OnePlus Nord Buds 2 सुद्धा कंपनी लॉन्च करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स

OnePlus Nord CE 3 Lite या फोनबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना यामध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतका असणार आहे. अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळणार आहे.

हेही वाचा : SmartPhones खरेदी करण्याचा विचार करताय?, १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट ५जी फोन

वापरकर्त्यांना यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके असणार आहे. नेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर मिळणार आहेत. हा फोन लेमन कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

काय असणार किंमत ?

वनप्लसच्या या स्मार्टफोनची म्हणजेच Nord CE 3 Lite ची किंमत ही बभरतामध्ये जवळपास २१,००० रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीने याआधीचा Nord CE 2 Lite हा फोन १९,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One plus nord ce 3 lite launch tomarrow in india with 108 mp camera with 5000 mah battery tmb 01
First published on: 03-04-2023 at 18:44 IST