OnePlus चा प्रीमियम बजेट स्मार्टफोन OnePlus 10 Pro 5G भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 8GB आणि 12GB रॅम अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोन Samsung Galaxy S22 Ultra शी स्पर्धा करेल, ज्यामध्ये 12GB RAM आणि 1TB स्टोरेज आहे. या दोनपैकी कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला आहे ते जाणून घ्या.

OnePlus 10 Pro vs Samsung Galaxy S 22 ची किंमत –OnePlus 10 Pro च्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 66,999 रुपये आहे. तर 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 71,999 रुपये असेल. 5 एप्रिल 2022 पासून Amazon India वरून हा फोन खरेदी करता येईल. Samsung Galaxy SS22 Ultra ची किंमत 1,34,999 रुपये आहे, जी 28 मार्चपासून सॅमसंग लाइव्ह सेलमध्ये खरेदी केली जाऊ शकते.

आणखी वाचा : Samsung ने Galaxy A सीरीजचे ५ स्मार्टफोन लॉन्च केले, किंमत १४,९९९ रुपये, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10 Pro vs Samsung Galaxy S22 चे स्पेसिफिकेशन – OnePlus 10 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोन पंच होल डिस्प्ले डिझाइन दर्शवतो, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus प्रथमच आपल्या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत आहे. यासोबतच हा Android 12 आणि ColorOS 12 वर चालतो. OnePlus 10 Pro 5,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जरसह येतो.

आणखी वाचा : भारतात लॉन्‍च झाला OnePlus 10 Pro 5G, 50MP व 48MP कॅमेरा, जाणून घ्या फिचर्स

OnePlus 10 Pro vs Samsung Galaxy S22 चे फीचर्स – OnePlus 10 Pro मध्ये 48MP मुख्य सोनी लेन्स, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8MP मॅक्रो शूटरसह ट्रिपल रिअर कॅमेरे पॅक केले आहेत. 10 Pro मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus 10 Pro देखील Hasselblad ब्रँडिंगसह येतो. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP, 12MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 3x आणि 10x झूमसह 10MP टेलिफोटो सेन्सर आहे. दुसरीकडे, Galaxy S22 Ultra 1TB स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 40MP फ्रंट कॅमेरा आहे.

याशिवाय, कमी प्रकाशात व्हिडीओ बनवण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 2.4um पिक्सेल सेन्सर आहे, जो कमी प्रकाशातही सहज आणि स्पष्ट व्हिडीओ बनवतो. यासोबतच त्याची झूम क्वालिटी 100x आहे. तसेच, या स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे जी 45w वायर आणि 15w वायरलेस चार्जरला सपोर्ट करते.