scorecardresearch

अरेरे…. लाँच होण्याआधीच लीक झाले वन प्लसच्या ‘या’ दमदार फोनचे सर्व फीचर्स, जाणून घ्या एका क्लिकवर

वन प्लसच्या दमदार फोनचे सादरीकरण होण्याआधीच फीचर्स समोर आले आहेत. जाणून घ्या या फोनचे सर्व फीचर्स.

अरेरे…. लाँच होण्याआधीच लीक झाले वन प्लसच्या ‘या’ दमदार फोनचे सर्व फीचर्स, जाणून घ्या एका क्लिकवर
Photo-indianexpress

वन प्लसचे स्मार्टफोन भारतासोबतच अनेक देशांमध्ये पसंत केले जातात, त्याची गुणवत्ता आणि किंमतींमध्ये खूप चांगल्या ऑफर्स पाहायला मिळतात. म्हणूनच वनप्लस ही एक प्रीमियम अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे ज्याचे जगभरात बरेच चाहते आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार, असे कळले आहे की वनप्लस कंपनी आपला नवीन मॉडेल ‘Oneplus 11 Pro’ हा दमदार फोन लवकरच लाँच करणार आहे. मात्र हा फोन लाँच होण्याआधीच या फोनचे फीचर्स समोर आले आहेत. काही काळापूर्वी OnePlus 11 Pro चा रेंडर लीक झाला होता. आता रेंडरसोबतच स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन्सही समोर आले आहेत. जाणून घ्या या फोनचे सर्व फीचर्स.

OnePlus 11 Pro वैशिष्ट्ये

OnePlus 11 Pro ला ६.७-इंचाचा QHD AMOLED डिस्प्ले मिळेल. त्याचा रिफ्रेश रेट १२०Hz असेल. स्मार्टफोनला सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट मिळण्याची अपेक्षा आहे. OnePlus चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Snapdragon ८ Gen २ प्रोसेसर सह आणला जाईल. क्वालकॉम या वर्षाच्या शेवटी या प्रोसेसरची घोषणा करू शकते.

हा OnePlus स्मार्टफोन १६ जीबी पर्यंत रॅम सह आणला जाऊ शकतो. तसेच, डिव्हाइस २५६ जीबी अंतर्गत स्टोरेजसह सुसज्ज असू शकते. OnePlus 11 Pro च्या बेस मॉडेलमध्ये ८ जीबी RAM सह १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज आहे.

आणखी वाचा : टेक्नोचा ‘हा’ नवा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार; लाँचपूर्वीच जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत…

कॅमेरा

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ५०MP मुख्य कॅमेरा मिळू शकतो. तसेच, डिव्हाइस ४८MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि ३२MP टेलिफोटो लेन्ससह येऊ शकते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६MP कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा मॉड्यूलमध्ये तीन कॅमेरा सेन्सर असू शकतात. या नवीन स्मार्टफोनमध्ये अलर्ट स्लाइडरच्या उपस्थितीचीही माहिती समोर आली आहे.

बॅटरी

हे सर्व फिचर्स आधीच्या मॉडेल्समध्ये देण्यात आले नव्हते कारण ही वैशिष्ट्ये केवळ हाय-एंड मॉडेल्समध्येच दिली जाऊ शकतात. या नवीन स्मार्टफोनचा रंग काळा असू शकतो.याशिवाय फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 11 Pro स्मार्टफोनमध्ये १००W फास्ट चार्जिंगसह ५०००mAh बॅटरी दिली जाईल.याशिवाय, फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, हॅसलबाड कॅमेरा आणि डॉल्बी अॅटमॉससह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी हे ५ जी, Wi-Fi ६E, ब्लूटूथ ५.२, GPS आणि USB टाइप-सी पोर्टसह येईल. डिव्हाइस Android १३ आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

कधी सादर होणार?

हा फोन २०२३ च्या पहिल्या तिमाहीत सादर केला जाऊ शकतो. आगामी काळात कंपनी यासंबंधी इतर माहिती शेअर करू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oneplus 11 pro phone features leaked pdb

ताज्या बातम्या