टेक्नोने बांग्लादेशमध्ये आपल्या पॉप-सिरीजमधील नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. आता लवकरच टेक्नोचा हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. याचे नाव ‘Tecno POP 6 Pro’ आहे. कंपनीने आपली मायक्रो वेबसाईट ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लाईव्ह केली आहे. तसंच, ट्विट करून त्याच्या लाँचिंगला छेडण्यात आलं आहे. मायक्रो साइटवरून फोनचे खास स्पेसिफिकेशन समोर आले आहे. ५०००mAh बॅटरीसोबतच इतरही अनेक उत्तम फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. टेक्नोचा हा आगामी स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या POP ५ Pro चे पुढचे व्हर्जन असल्याचे म्हटले जात आहे.

Tecno POP 6 Pro कधी लाँच होणार?

Tecno POP 6 Pro बजेट रेंज स्मार्टफोन म्हणून सादर करू शकतो. त्याच वेळी, लॉन्च करण्यापूर्वी त्याची किंमत देखील समोर आली आहे. Amazon Microsite नुसार हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप लॉन्च डेटचा खुलासा केलेला नाही, पण ९१ मोबाईलच्या रिपोर्टनुसार, हे २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान लॉन्च केले जाईल. यासोबतच रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की फोनची किंमत ६,४९९ रुपये असू शकते. याशिवाय स्मार्टफोनची नेमकी किंमत लॉन्चच्या वेळीच समोर येईल.

आणखी वाचा : ‘हा’ फोन मिळत आहे तब्बल ११ हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या खास फीचर्स

Tecno POP 6 Pro वैशिष्ट्ये

या Tecno फोनमध्ये ६.५६-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याची शिखर ब्राइटनेस ४८०nits असू शकते. डिव्हाइस वॉटर ड्रॉप नॉचसह येऊ शकते. त्याच्या मागील पॅनलवर एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमधील पॉवर बटणावरच फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. कंपनीने पुष्टी केली आहे की या आगामी स्मार्टफोनमध्ये AI लेन्स आणि LED फ्लॅशसह ८MP बॅक कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसच्या समोर ५MP लेन्स दिला जाऊ शकतो.

यासोबतच या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी मिळू शकते. फोन पीसफुल ब्लू आणि पोलर ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. मायक्रो साइटवर याबद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की हा डिवाइस ऑक्टा-कोर Helio A२२प्रोसेसर सह येऊ शकतो. यात दोन जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android ११ Go एडिशनवर काम करू शकतो.