scorecardresearch

स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ गाजणार, OnePlus Nord 2T वरून अखेर पडदा उठला

OnePlus ने शुक्रवारी आपला नवाकोरा स्मार्टफोन Nord 2T लॉन्च केला. OnePlus Nord 2T हा कंपनीचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन आहे. गेल्या काही दिवसांपासून OnePlus Nord 2T बद्दल माहिती सतत समोर येत आहे.

oneplus-nord-2t
(फोटो क्रेडिट- वनप्लस)

OnePlus ने शुक्रवारी आपला नवाकोरा स्मार्टफोन Nord 2T लॉन्च केला. OnePlus Nord 2T हा कंपनीचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन आहे. गेल्या काही दिवसांपासून OnePlus Nord 2T बद्दल माहिती सतत समोर येत आहे. कोणत्याही लॉन्च इव्हेंटशिवाय, कंपनीने हा स्मार्टफोन युरोपमध्ये कोणताही गाजावाजा न करता लॉन्च केला.

बातम्यांनुसार, OnePlus Nord 2T लवकरच इतर मार्केटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या चीनी कंपनीने कोणत्याही प्रकारची अधिकृत रिलीज डेटबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

OnePlus Nord 2T Specifications
OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन फुलएचडी + आहे. हँडसेटमध्ये AMOLED पॅनेल आहे, ज्याचा रीफ्रेश दर 90 Hz आहे. डिस्प्लेच्या वर पंच-होल कटआउट दिलेला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.

हे डिव्हाइस Android 12 OS आधारित ऑक्सिजन 12.1 वर चालते. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX766 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आहे. त्याचबरोबर समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, म्हणजेच कंपनीने सेल्फी शौकीनांची काळजी घेतली आहे आणि एक मजबूत फ्रंट कॅमेरा दिला आहे.

आणखी वाचा : VPN कंपनी आता भारतात कमीत कमी ५ वर्षाचा डेटा सेव्ह करणार, MeitY ने दिले आदेश

OnePlus Nord 2T ला पॉवर देण्यासाठी, 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सध्या OnePlus Nord 2T स्मार्टफोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.

OnePlus Nord 2T Price
OnePlus Nord 2T ची किंमत ३९९ युरो (सुमारे ३२,५०० रुपये) आहे. हा फोन काळ्या आणि हिरव्या रंगात लॉन्च करण्यात आला आहे. या महिन्यात हा हँडसेट भारतीय बाजारातही लॉन्च होऊ शकतो. कमी किमतीत हा फोन भारतात उपलब्ध करून दिला जाईल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oneplus nord 2t launched with 80w fast charging price specifications and features prp

ताज्या बातम्या