scorecardresearch

Premium

OnePlus Open फोल्डेबल स्मार्टफोनच्या सेलला आजपासून सुरूवात; ५ हजारांच्या डिस्काउंटसह मिळणार…, जाणून घ्या

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४,८०५ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

one plus open foldable smartphone sale started today
वनप्लस ओपनन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. (Image Credit- Oneplus/X)

वनप्लस कंपनीने नुकताच आपला ‘वनप्लस ओपन’ फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. २७ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनचा सेल भारतात सुरु झाला आहे. १९ ऑक्टोबर रोजी हा फोन भारतासह जगभरात लॉन्च झाला आहे. यामध्ये Qualcomm चा टॉप टिअर स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे. वनप्लसने लॉन्च केलेल्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत व सेल सुरु झाल्यानंतर खरेदीदारांना कोणकोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

OnePlus Open : फीचर्स

वनप्लस ओपनच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कॉम्पॅक्ट डिझाइन देण्यात आले आहे. फोनची उंची १५३.४ मिमी इतकी आहे. तर फोनचे वजन हे जवळपास २३९ ग्रॅम इतके आहे. तसेच एमराल्ड डस्कचे वजन जवळपास २४५ ग्रॅम इतके आहे. वनप्लस ओपननमध्ये वापरकर्त्यांना ७.८२ इंचाचा फ्लॅक्सि फ्लयुड AMOLED प्रायमरी डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा ब्राइटनेस २८०० नीट्स इतका आहे. याशिवाय डिस्प्लेचे रिझोल्युशन २४४० x २२६८ पिक्सेल इतके आहे. तसेच फोनचा बाहेरील डिस्प्ले हा ६.३१ इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्युशन २ के इतके आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा फोन नवीन OxygenOS १३.२ वर आधारित अँड्रॉइड १३ वर चालतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Northern Coalfields Limited Recruitment 2024 invited applications for 152 Assistant Foreman posts
NCL Recruitment 2024: नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील
Emmanuel Macron
“२०३० पर्यंत फ्रान्सच्या विद्यापीठांत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट”, प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितली योजना
Mumbai Diamond Industry Surat Diamond Bourse
हिरे उद्योगातील प्रमुख किरण जेम्सचे पुन्हा मुंबईत स्थलांतर; कंपनीची मालकी, संस्थापक अन् आर्थिक कामगिरीबद्दल जाणून घ्या
Surat Diamond Bourse
गुजरातच्या ‘किरण जेम्स’ यांची पुन्हा मुंबईवापसी; सूरत डायमंड बोर्स आपली चमक गमावणार

हेही वाचा : फक्त ९९९ रूपयांमध्ये लॉन्च झाला नोकियाचा 105 Classic फोन; UPI फीचरसह मिळणार…

OnePlus Open : कॅमेरा

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यामध्ये सोनीचा LYT-T808 ‘पिक्सेल स्टॅक्ड’ (Pixel Stacked) CMOS सेन्सर OIS सह येतो. तसेच यामध्ये ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा जोडण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वापरकर्त्यांना ६० FPS सह ४ के क्वालिटीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सलचा प्राथमिक व ३२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळणार आहे. फेस अनलॉक, नाइटस्केप सेल्फी, सेल्फी एचडीआर, टाइम लॅप्स, ड्युअल व्ह्यू व्हिडीओ आणि अन्य काही फीचर्स देण्यात आले आहेत. वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४,८०५ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच याला ६७ W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ४२ मिनिटांमध्ये १ ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. एकदा चार्ज केल्यास एका दिवसापेक्षा अधिक काळ वापरता येऊ शकतो. रिटेल बॉक्समध्ये ग्राहकांना एक चार्जर देखील मिळणार आहे.

हेही वाचा : आता X वर देखील घेता येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग फीचरचा आनंद; कसे वापरायचे? जाणून घ्या

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन: किंमत आणि ऑफर्स

भारतात वनप्लस ओपनच्या १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,३९,९०० रुपये आहे. हा फोन वनप्लस ओपन फोल्डेबल फोन एमराल्ड डस्क (Emerald Dusk )आणि वोयजर ब्लॅक (Voyager Black) या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा फोन वनप्लसची अधिकृत वेबसाईट आणि अमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. तसेच नवीन ओपनप्लस ओपन खरेदी करताना ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेचे डेबिट व क्रेडिट कार्डाचा वापर केल्यास त्यांना ५ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळू शकतो. काही निवडक डिव्हाइसवर ८ हजारांचा ट्रेड इन बोनस देखील मिळणार आहे. तसेच वनप्लस या डिव्हाइसवर एका वर्षासाठी नो-कॉस्ट ईएमआय सुविधा देखील देत आहे. ज्या खरेदीदारांनी वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनची प्री-ऑर्डर केलेली आहे , त्यांना या फोनसह PU केस देखील मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oneplus open foldable smartphone sale started india with 13000 rs discount no cost emi check offers tmb 01

First published on: 27-10-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×