OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन यांनी आपल्या भारत भेटीतील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सॅम ऑल्टमन यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सॅम ऑल्टमन यांना धन्यवाद दिले आहेत.

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे गेले काही दिवसांपासून भारतामध्ये आहेत. त्यांनी आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच G20 शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांची देखील भेट घेतली आहे. आयआयटी दिल्लीमधील एका कार्यक्रमात भाग घेऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: Vi ने ‘या’ युजर्ससाठी लॉन्च केले इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन, अनलिमिटेड डेटासह मिळणार…, २९ देशांचा आहे समावेश

गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ऑल्टमन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यावर या भेटीत कशावर चर्चा झाली हे उघड केले. ऑल्टमन म्हणाले, ” देशमसमोर असणाऱ्या संधी, त्यासाठी देशाने काय काय केले पाहिजे तसेच उतार चढाव रोखण्यासाठी जागतिक नियमनाबद्दल विचार करणे आवश्यक आहे. या विषयांवर चर्चा झाली. ” तसेच त्यांनी पुढे खुलासा केला की, पंतप्रधान मोदी यांनी AI ची क्षमता, भारतात याद्वारे लॉन्च केल्या जाणाऱ्या किंवा निर्माण केल्या जाणाऱ्या संधी व त्यासाठीचे आवश्यक असणारे नियम यावर चर्चा केली. तसेच त्यांनी या नवीन टेक्नॉलॉजीच्या नकारत्मक बाजूबद्दल देखील काही गोष्टींवर चर्चा केली.

तसेच या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील ऑल्टमन यांना ट्विट करून धन्यवाद दिले आहे. त्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ” ” भारताची टेक इको सिस्टीम वाढवण्यासाठी AI मध्ये खूप मोठी क्षमता आहे. तसेच ती क्षमता विशेषतः तरुणांमध्ये आहे. आम्ही अशा सर्व गोष्टींचे स्वागत करू ज्या आमच्या डिजिटल परिवर्तनाला गती देऊ शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : आता भारतात Facebook आणि Instagram वर मिळेल ब्लू टिक; इतके पैसे मोजावे लागणार

सॅम ऑल्टमन हे ओपनएआय कंपनीचे सीईओ आहेत. या कंपनीनेच ChatGPT हे AI जनरेटिव्ह टूल तयार केले आहे. जे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. हे मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाले आहे.