OPPO ने भारतीय बाजारपेठेत आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन ‘OPPO A77s’ लाँच केला आहे. ए सीरीजमध्ये जोडण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत, सोबतच फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया…

फीचर्स

OPPO A77s  स्मार्टफोन १६१२ x ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५६ इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी ९०हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच ओप्पो या मोबाईल डिस्प्लेमध्ये ६००निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट देखील मिळतो. OPPO A77s मध्ये स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

OPPO A77s अँड्रॉइड आधारित कलर ओएस १२.१ वर लाँच झाला आहे जो २.४ गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये ८ जीबी रॅम आहे जो ५ जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यास ओप्पो ए77एस १३जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. तसेच फोन स्टोरेज मेमरी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

आणखी वाचा : Motorola ७ ऑक्टोबर रोजी भारतात सादर करणार ‘हा’ दमदार फोन; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत…

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए77एस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/१.८ अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/२.४ अपर्चर असलेल्या २ मेगापिक्सल मोनो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपर्चर असलेला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

बॅटरी

OPPO A77s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. ३.५ एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी ओप्पो मोबाईलच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए77एस मध्ये ३३W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह ५,०००एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओप्पो ए77एस स्मार्टफोन भारतात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा ओप्पो मोबाइल 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, जोडीला १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OPPO A77s स्मार्टफोनची किंमत १७,९९९ आहे जो Sunset Orange आणि Starry Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ओप्पो ए77एसवर बँक ऑफर अंतगर्त १० टक्के कॅशबॅक मिळत आहे तसेच हा सहा महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल.