ओप्पोने आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. १५ डिसेंबरला फोनचं अनावरण केलं जाणार आहे. कंपनीचा हा पहिले फोल्डेबल आहे. याचे नाव ओप्पो Find N असं ठेवण्यात आलं असून त्याची माहिती कंपनीने स्वतः ट्विट करून दिली आहे. या फोनमध्ये ८-इंचाचा डिस्प्ले आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. यासोबतच इतरही अनेक चांगले फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील. ओप्पो Find N तयार करण्यासाठी कंपनी गेल्या चार वर्षांपासून काम करत आहे आणि आतापर्यंत त्याचे प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहेत. ओप्पोने Find N च्या प्रोटोटाइपवर २०१८ पासून काम करायला सुरुवात केली आहे, तर सॅमसंग, Xiaomi आणि Huawei सारख्या ब्रँडने त्यांचे फोल्डेबल फोन आधीच लॉन्च केले आहेत.

मुख्य उत्पादक अधिकारी पीट लाऊ यांनी सांगितले की, “स्मार्टफोन उद्योग अशा मर्यादेपर्यंत पोहोचला आहे जिथे वापरकर्त्यांना उत्तम रीफ्रेश दर, फोटोग्राफी सेन्सर, मोबाइल फोटोग्राफी मोड आणि जलद चार्जिंग पर्याय मिळतात.” ओप्पो Find N चे आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. या फोल्डेबल फोनला ८ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले १२० एचझेड च्या रिफ्रेश रेटसह मिळेल. गेमिंग अनुभव आणि उत्तम स्क्रोलिंगमध्ये मदत करतो. त्याच्या कव्हरवर एक डिस्प्ले देखील असेल, ज्याला आऊटर डिस्प्ले म्हणतात, त्याचा रिफ्रेश दर ६०एचझेड असेल. या फोल्डेबल फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. तसेच, यात अँड्रॉइड १२ आधारित कलरओएस १२ मिळेल, जो अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तसेच, या मोबाइलला४५०० एमएएच बॅटरी आणि ६५ वॅट फास्ट चार्जर मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओप्पो Find N च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असेल, त्याला सोनी IMX766 सेन्सर आहे. तसेच, यात १६-मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर असेल, जो सोनी IMX481 असेल. यातील तिसरा कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे, त्यात सॅमसंग S5K3M5 सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ३२-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.