नेटफ्लिक्स लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. यावर जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील कंटेन्ट उपलब्ध होतो. भारतीय प्रेक्षकांनीही नेटफ्लिक्सवरील कंटेन्टला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. हाच लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स डाऊन झाले आहे. नेटफ्लिक्स डाऊन झाल्यामुळे भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्या निर्माण झाली आहेत. तसेच साईट डाऊन झाल्यामुळे वापरकर्ते देखील निराश झाले आहेत.
नेटफ्लिक्स वापर असताना वापरकर्त्यांना मोबाईल अॅप तसेच साईटवर समस्या येत आहेत. बरेच वापरकर्ते नेटफ्लिक्सची साईट ओपन करू शकत नाही आहेत. सर्व्हिस डाऊन झाल्यामुळे अनेक व्हिडीओ त्याना प्ले करून बघता येत नाही आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार Downdetector ने देखील Netflix डाउन झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
२४ तासांपूर्वी Twitter ची सेवा देखील ठप्प झाली होती. ट्विटरची सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांना ट्विट पाहताना किंवा ट्विट पोस्ट करत असताना समस्या येत होती. त्यामुळे वापरकर्त्यानी नाराज होऊन #TwitterDown हा ट्रेंड सुरु केला होता.