सध्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक मोठ्या टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यामध्ये Google , Microsoft , IBM , Amazon यासह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आता या यादीमध्ये PayPal या कंपनीचे देखील नाव जोडले जाणार आहे. कारण ही कंपनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

Paypal कंपनीने आपल्या ७ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. जर या टक्केवारीनुसार कंपनीने कारवाई केली तर तब्बल २००० कमर्चाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार , कंपनीने केलेली ही घोषणा म्हणजे खर्च कमी करण्याचे संकेत आहेत. जगभरातील लोक त्यांच्या उत्पन्नांच्या स्रोतांबद्दल चिंतेमध्ये आहेत. त्यामुळे नोकरी वाचवणे आणि अधिकाधिक सेव्हिंग करणे याकडे त्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा : Google Layoffs: Google ने कामावरून काढून टाकताच महिला झाली भावूक; म्हणाली, “बॉसला फोन केला अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही आमच्या खर्चाच्या संरचनेचा पाया बदलण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. आम्ही आमची संसाधने आमच्या मुख्य धोरणात्मक प्राधान्यांवर केंद्रित केली असून यावर आम्हाला अजून काम करायचे आहे. एक अहवालानुसार पेमेंट फार्म असलेल्या PayPal चे शेअर गेल्या वर्षी ६० टक्क्यांनी घसरले . मात काल या शेअरमध्ये २ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे असे मेंट फर्म PayPal चे चीफ एक्झिक्युटिव्ह डॅन शुलमेन यांनी एका निवेदनात म्हटले.

PayPal कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याआधी अनेक दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे.Vodafone Idea ने पुढील पाच वर्षात शेकडो कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे, तर Amazon ने कामावरून काढलेल्या कर्मचार्‍यांची संख्या १०,००० वरून १८,००० केली आहे.