scorecardresearch

“तुम्ही कितीही क्रिएटिव्ह असला, तरी देखील ChatGpt…”; IIT Delhi च्या प्राध्यापकाचं विधान

सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.

iit dehi prof. v. ramgopa rao news at chatgpt
IIT Delhi And ChatGpt- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोक ChatGPT वळत आहेत. हे माध्यम लवकरच मानवाची जागा घेईल असे चित्र दिसत आहे यामुळे हे माध्यम चिंतेचा विषय बनले आहे. या निर्माण होणाऱ्या चिंतेबाबत बोलताना आयआयटीचे प्राध्यापक चॅटजीपीटी-नंतरच्या युगात प्रासंगिक राहण्याबाबत’ सल्ला देत आहेत.

हेही वाचा : ChatGpt Plus: चॅटबॉट वापरासाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे, जाणून घ्या

आयआयटी दिल्लीमधील माजी संचालक आणि प्रोफेसर व्ही. रामगोपाल राव यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, मी विद्यार्थ्यांना सांगायचो की जर ते क्रिएटिव्ह नसतील तर गुगल त्यांची जागा घेईल. आता ChatGPT हे माध्यम येत आहे. हे काही महिने वापरल्यानंतर मी त्यांना सांगतो की, जरी तुम्ही क्रिएटिव्ह असलात तरी देखील चॅटजीपीटी त्यांची जगा घेईल अशी शक्यता आहे.

प्रोफेसर राव यांचे ५ महत्वाचे सल्ले

आयआयटीचे प्राध्यपक हे सतत शिकण्याच्या आणि कौशल्यांमध्ये सुधारणा कशी करता येईलयाच्यावर भर देतात. तुमची वैयक्तिक आणि ग्रुपची उत्पादकता वाढण्याच्या दृष्टीने ChatGPT सारख्या नवीन माध्यमाचा कसा वापर करावा हे शिकले पाहिजे. जसे तुम्ही Google मॅप्स न वापरता येणाऱ्या माणसाला ड्रॉयव्हर म्हणून कामाला ठेवणार नाही . तसेच तुम्हाला ही माध्यमे प्रभावीपणे वापरू शकत नसाल तर , भविष्यात कोणतीही कंपनी तुम्हाला कामावर घेणार नाही. टेक्नॉलॉजी हे उपयोगी साधन आहे मात्र ते धोकादायक सुद्धा ठरू शकते हे नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

प्रोफेसर राव यांच्या शब्दांत नाविण्य हे सर्जनशीलतेच्या पलीकडे चालले आहे. तुमच्या कल्पनांसाठी मूल्य निर्माण करत आहे. यासाठी तो वेगवेगळी संस्कृती , दृष्टिकोन आणि र्श्वभूमीतून आलेल्या लोकांशी नेटवर्किंग करण्याची शिफारस करतो.

५ महत्वाच्या मुद्द्यांमध्ये आयआयटी प्रोफेसर सुचवतात की तुमची कृती ही उथळ किंवा अनौपचारिक स्वरूपाची असू नये. तुम्ही करत असलेली नोकरी ही खूप आरामदायी वाटत असेल आणि तुम्ही ज त्यात नवीन काही शिकत नसाल तर ती नोकरी फार काळ टिकू शकत नाही.

हेही वाचा : Microsoft ने लाँच केली ChatGPT टीम प्रीमियम सेवा, वापरकर्त्यांना मिळणार ‘हे’ फायदे

तुम्ही तुमच्या ग्रुपमधील ऑफिसमधील एक प्रभावी कर्मचारी असण्याची गरज आहे कारण तुम्ही वैयक्तिकरित्या किती चांगले आहेत यापेक्षा तुमच्या ग्रुपसाठी ऑफिससाठी किती चांगले आहात हे महत्वाचे असते.

तुम्ही काम करताना किंवा एखादा निर्णय घेताना हृदय आणि मन यांचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमचे निर्णय डोक्याने घेत असाल तर तुम्हाला तुमची आवड कधीच सापडू शकत नाही व कधीही मोठी गोष्ट साध्य करू शकत नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:41 IST