Realme एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. रिअलमीने भारतात अखेर Realme 11 Pro 5G सिरीज लॉन्च केली आहे. रिअलमीने या सिरीजअंतर्गत Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन रिअलमी स्मार्टफोन चीनमध्ये मे २०२३ मध्येच लॉन्च करण्यात आले आहेत. या दोन्ही फोनच्या फीचर्सबद्दल, किंमतीबाबदल जाणून घेऊयात.

Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro+ 5G चे फीचर्स

रिअलमीच्या ११ प्रो या सिरीजमधील या दोन्ही फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा फुलएचडी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या स्क्रीनचा टच सॅम्पलिंग रेट ३६० Hz इतका आहे. रिअलमी ११ प्रो आणि रिअलमी ११ प्रो + स्मार्टफोनमध्ये ड्युअल नॅनो सिम सपोर्ट करते. दोन्ही फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 प्रोसेसर ग्राफिक्ससाठी Mali-H68 GPU देण्यात अले आहे. हे दोन्ही डिव्हाईस १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेजसह लॉन्च करण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 स्किनसह येतात. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

Syria,lebanon Israel,pagers pager blast
विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
tall people cancer risk
उंच लोकांना होऊ शकतो तब्बल आठ प्रकारचा कॅन्सर, इतरांच्या तुलनेत धोकाही सर्वाधिक; कारण काय?
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Trademark Violation, namesake restaurant, pune,
व्यापार चिन्हाच्या उल्लंघनाचा वाद : पुण्यातील नेमसेक रेस्टॉरंटला बर्गर किंग नाव वापरण्यास तूर्त मज्जाव

हेही वाचा : ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या सविस्तर

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Realme 11 Pro 5G, Realme 11 Pro+ 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देनाय्त आला आहे. रिअलमी प्रो ५जी मध्ये OIS सह १०० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 11 Pro+ 5G या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा Samsung HP3 प्रायमरी सेंसरसह येतो. हा सेंसर Super OIS सपोर्ट देतो. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतात. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा ग्राहकांना मिळणार आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर प्रो + व्हेरिएंटमध्ये १००W SuperVOOC चा फास्ट चार्जिंग सपोर्ट तर रिअलमी प्रो मध्ये ६७ W चा चार्जिंग सपोर्ट मिळतो.

हेही वाचा : आता भारतात Facebook आणि Instagram वर मिळेल ब्लू टिक; इतके पैसे मोजावे लागणार

काय असणार दोन्ही फोनची किंमत ?

Realme 11 pro + च्या ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. तर १२/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये इतकी आहे. या फोनची विक्री Amazon, Realme ची अधिकृत साईटवर आणि रिटेल स्टोअरमध्ये १५ जूनपासून सुरू होणार आहे. Realme 11 Pro+ 5G च्या ८/२५६ जीबी या व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये ठेवण्यात आली असून, १२/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये असणार आहे.