OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन आपल्या भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा कंपनीने ChatGPT सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरू झालेल्या AI क्रांतीचे नेतृत्व हे ऑल्टमन यांच्याकडे होते. तसेच ते आयआयटी दिल्ली येथे भेट देणार आहेत.

जगभरातील AI रेग्युलेशनमध्ये भारताची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे असे ऑल्टमन म्हणाले आहेत. ऑल्टमन पुढे म्हणाले, ” जी २० परिषद लवकरच होणार आहे. यामध्ये या प्रकारच्या संभाषणामध्ये भारत मोठी भूमिका बजावू शकतो. ” भारताच्या स्टॅकबद्दल ऑल्टमन यांना त्यांचे मत विचारले असता, ते म्हणाले भारताने दिलेल्या योगदानामुळे मी प्रभावित झालो आहे. तसेच भारत सरकार AI चा वापर इतर सेवांसह एकत्रित करून देखील करू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.

bhagwant maan on modi in interview
“…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?
Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

हेही वाचा : Layoff News: मंदीचे सावट अजूनही कायम; आता ‘ही’ कंपनी करणार कर्मचाऱ्यांची कपात

सॅम ऑल्टमन म्हणाले, ”राष्ट्रीय टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय मालमत्ता याबाबतीत भारताने जे काही केले आहे ते खूप प्रभावी आहे. मात्र ही टेक्नॉलॉजी इतर सेवांमध्ये कसे एकत्रित करून वापरता येईल यावर सरकारने भर दिला पाहिजे. आम्ही सर्व सरकारी सेवांना अधिक चांगले करण्यासाठी Language-Learning मॉडेल (LLMs ) चा वापर करण्यास सुरूवात करू. ”

न्यूक्लिअर फ्युजन टेक्नॉलॉजीबद्दल आपण उत्सुक असल्याचा खुलासा सॅम ऑल्टमन यांनी केला. ओपनएआयचे सीईओ ऑल्टमन यांनी Helion Energy मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जगातील पहिलाफ्युजन प्लांट तयार करण्याची कंपनीची योजना आहे जी अमर्यादित स्वछ ऊर्जा तयार करण्यासाठी सक्षम असेल.