८ तारखेपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल ७ तारखेलाच सुरु झाला आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक प्रॉडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज २०२३ च्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर ८० टक्के सूट मिळणार आहे. लॅपटॉपवरील डील्स १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तसेच कीबोर्डची किंमत केवळ ९९ रुपये असणार आहे. टॅबलेटवर ७० टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे. तर आज आपण फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये २५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणारे स्मार्टफोन कोणकोणते आहेत? त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Redmi Note 12 Pro 5G
Redmi Note 12R Pro 5G लॉन्च झाल्यामुळे रेडमीच्या नोट १२ या सिरिजमध्ये आणखी एक फोनची एंट्री झाली आहे. या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी १०८० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. रेडमी नोट प्रो मध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६७W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये ५० मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील मिळतो.
vivo V29e
जर का तुम्ही २५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत एखादा चांगला सेल्फी कॅमेरा असणारा स्मार्टफोन शोधात असाल तर तुम्ही विवोच्या V29e या फोनचा विचार करू शकता. याफोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ६.७८ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. फोनच्या मागील बाजूस ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर व एक ड्युअल कॅमेरा सेटअप येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी देखील ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Motorola Edge 40
मोटोरोला एज ४० मध्ये वापरकर्त्यांना मिडियाटेक डायमेन्शन ८०२० प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच ६.५५ इंचाचा P-OLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १४४ Hz इतका आहे. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक ड्युअल कॅमेरा सेटअप मिळते. चार्जिंगसाठी ६८W च्या फास्ट चार्जिंगसह या फोनमध्ये ४४०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते.
OnePlus Nord CE 3 Lite 5G
वनप्लसने कंपनीने आपला OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. तुम्हाला जर का बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही वनप्लसच्या Nord CE 3 Lite 5G फोनचा विचार करू शकता. या फोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तसेच ६.७२ इंचाचा IPS एलसीडी डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ६७ W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.