Reliance Jio ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशामध्ये सर्वात पाहिलांदा ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. त्यापाठोपाठ एअरटेलने देखील आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तसेच जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. त्यात अनेक फायदे कंपनी देते. तसेच कंपनीने ७८९ आणि ५८९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत तर त्यामध्ये ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओचा ७८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओने आपला ७८९ रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे . तसेच वापरकर्त्यांना यामध्ये JioSaavn Pro सबस्क्रिप्शन मिळेल. ज्यामुळे वापरकर्ते अनलिमिटेड म्युझिकचहा अँन्ड घेऊ शकणार आहेत. हा प्लॅन ८४ दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज करण्याचे फायदे मिळतात. याबाबतचे वृत्त Telecomtalk ने दिले आहे.
तसेच या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना लाईव्ह तिची स्ट्रीमिंगसाठी JioTV, चित्रपट आणि टीव्ही शो यांच्या निवडीसाठी JioCinema, JioCloud आणि डिव्हाईस सेफ्टीसाठी JioSecurity मध्ये प्रवेश देखील मिळतो.
रिलायन्स जिओचा ५८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
ज्या वापरकर्त्यांना कमी वैधता असणारा प्लॅन हवा असेल त्यांच्यासाठी कंपनीने ५८९ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ७८९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व फायदे मिळतात. फक्त यामध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. दरोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि JioSaavn Pro सबस्क्रिप्शनचा फायदा मिळणार आहे.
जिओच्या या दोन्ही प्लॅन्सची महत्वाची गोष्ट म्हणजे यामद्ये वापरकर्त्यांना ५ जी डेटा वापरता येऊ शकतो. कंपनीने २०२३ च्या अखेरीस संपूर्ण देशात ५जी सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रीपेड प्लॅन्सचा लाभ घेण्यासाठी वापरकर्ते MyJio अॅप, Jio.com किंवा इतर कोणत्याही लोकप्रिय रिचार्ज प्लॅटफॉर्मद्वारे सहजपणे रिचार्ज करू शकतात.
