रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये जिओनेच सर्वात पहिल्यांदा ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे तसेच ओटीटीचे फायदे देखील मिळतात. रिलायन्स जिओकडे भारतीय ग्राहकांसाठी एकूण पाच पोस्टपेड प्लॅन्स आहेत. हे प्लॅन २९९ रुपये ते १,४९९ रुपये या किंमतचे आहेत. या सर्व प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना ५ जी डेटा ऑफर करते. रिलायन्स जिओच्या ५ जी वेलकम ऑफरच्या नियम आणि अटींनुसार, २३९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचे प्लॅन असल्यास मोबाइल रिचार्ज करणारा कोणताही वापरकर्ता ५ जी ऑफरचे फायदे मिळवण्यासाठी सक्षम असणार आहे.

जर का वापरकर्ता टेलिकॉम कंपनीच्या ५ जी नेटवर्क अंतर्गत प्लॅन वापरत असतील आणि त्याच्याकडे ५ जी सपोर्ट असणारा फोन असेल तर, तो वापरकर्ता ५ जी नेटवर्कचा आनंद घेऊ शकतो. जसेच वापरकर्त्याला अनलिमिटेड ५जी डेटा मिळेल. रिलायन्स जिओने दोन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत, ज्यांची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. २९९ रुपये आणि ३९९ रुपयांचे प्लॅन आहेत जे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन आहेत. या दोन पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणकोणते फायदे मिळतात, ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!

हेही वाचा : जिओने लॉन्च केला १,२९९ रुपयांचा Bharat B1 4G फोन; ‘या’ फीचरच्या मदतीने करता येणार युपीआय पेमेंट

जिओचा २९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ३० जीबी डेटा महिन्याला मिळतो. हा देता तुम्ही एकाच दिवशी किंवा पूर्ण महिना देखील वापरू शकता. ३० जीबीपेक्षा जास्त डेटा वापरला गेल्यास प्रत्येक अतिरिक्त १ जीबी डेटासाठी तुम्हाला १० रुपये मोजावे लागणार आहेत. हा प्लॅन ५जी नेटवर्क अंतर्गत येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचे फायदे देखील मिळतात. तसेच वापरकर्त्यांना जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

जिओचा ३९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा मिळतो. ५ जीबी डेटा संपल्यानंतर अतिरिक्त वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक १ जीबीसाठी तुम्हाला १० रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. हा प्लॅन ५जी नेटवर्क अंतर्गत येतात. तसेच या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो. तसेच जिओटीव्ही, जिओक्लाऊड आणि जिओसिनेमा यांसारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.