जिओ ही एक दूरसंचार कंपनी आहे जी आपल्या ग्राहकांना कमी खर्चात अधिक फायदे देण्यासाठी अनेक प्रीपेड योजना प्रदान करते. यामध्ये स्वस्त ते महागड्या योजनांपर्यंत अनेक पर्यायांचा समावेश आहे. यापैकी एक श्रेणी म्हणजे डेटा पॅक. आपल्या प्लॅनचा डेटा संपल्यावर हे पॅक उपयोगी पडतात. कंपनीने आपल्या अनेक डेटा पॅकमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी जिओ ६१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा देत होता. आता या पॅकमध्ये बदल करुन आपल्या ग्राहकांना जणू काही बंपर लाॅटरीच मिळवून दिली आहे.

Jio Rs 61 प्रीपेड पॅक

जिओने ६१ रुपयांच्या खाली डेटा पॅक उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी या पॅकमध्ये ६ जीबी डेटा दिला जात होता. पण आता या पॅकसोबत अतिरिक्त ४ जीबी डेटाही दिला जात आहे. यानंतर यूजर्सना ६१ रुपयांमध्ये १० जीबी डेटा मिळेल.

या पॅकची वैधता तुमच्या सक्रिय योजनेच्या वैधतेसारखीच असेल. १०GB हायस्पीड डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, इंटरनेट स्पीड ६४Kbps पर्यंत मर्यादित होईल.

(हे ही वाचा : ९०,००० हजाराचा Dell Laptop वॉरंटीसह मिळतोय १७ हजारात, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा शानदार डील)

एअरटेल प्लॅन मध्ये काय आहे खास?

Airtel बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ६५ रुपयांचा प्लान देत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ४ GB डेटा दिला जात आहे. हा पॅक तुमच्या सक्रिय योजनेच्या वैधतेइतका असेल. तथापि, संपूर्ण डेटा संपल्यानंतर, तुमच्याकडून प्रति एमबी ५० पैसे दराने शुल्क आकारले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

VI तर कंपनी ५८ रुपयांचा प्लान देत आहे. यामध्ये युजर्सना ३ जीबी डेटा दिला जात आहे. या पॅकची वैधता २८ दिवस आहे.