तंत्रज्ञान जगात दिवसेंदिवस मोठे बदल होताना दिसत आहेत. आता टॅबलेटच्या निर्मितीमध्येही तंत्रज्ञानाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. कागदासारखा हलकाफुलका दिसणारा हा टॅबलेट एका खास कंपनीने लॉंच केला आहे. नॉर्वेजियन टॅबलेट ब्रँड (Norwegian Tablet Brand) ‘रीमार्केबल’ने एक खास घोषणा केली आहे. या ब्रॅण्डने रीमार्केबल२ हा पेपर टॅबलेट लाँच केला आणि भारताबरोबर भागीदारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

पेपर टॅबलेट विशेषत नोट्स लिहिणे किंवा वाचणे आणि रिव्ह्युव्ह करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. तुम्ही कागदावर लिहीत आहात, असा अनुभव तुम्हाला हा टॅबलेट देईल. तसेच वापरकर्त्यांनी लिहिलेल्या किंवा टाईप केलेल्या नोट्सची पुनर्रचना करण्यास मदत किंवा नोट्स पीडीएफ आणि ई-बुक्सवर कन्व्हर्ट करण्यास मदत करतील. पेपर टॅबलेट सॉफ्टवेअर इको सिस्टीमद्वारे समर्थित आहे; जे क्लाउड-आधारित मोबाइल आणि डेस्कटॉप ॲप वापरून अनेक उपकरणांवर कार्य करते, असे कंपनीने सांगितले आहे.

हेही वाचा…स्मार्टफोन, फ्रीज-टीव्हीवर ‘बंपर’ सूट ! Samsung ची भन्नाट ऑफर एकदा पाहाच…

रीमार्केबलचे सीईओ फिल हेस म्हणाले, “आम्ही रीमार्केबल२ भारतात लॉंच करण्यासाठी खूप उत्सुक होतो. भारत एक अशी बाजारपेठ आहे; ज्यामध्ये संस्कृती, तंत्रज्ञानाची जाण असणारी लोकसंख्या आणि भरभराट होत असलेली डिजिटल अर्थव्यवस्था आहे. आम्ही भारतातील लोकांना अधिक चांगला विचार करण्यास सक्षम करण्यासाठी reMarkable 2 ची रचना केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, भारतीय आमच्या दृष्टिकोनाची नक्कीच प्रशंसा करतील.“

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रीमार्केबल२ पेपर टॅबलेट आता भारतात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर वर प्री-ऑर्डरसाठी ४३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी मार्करसह टॅबलेटसाठी काही खास वस्तूसुद्धा देते आहे. त्यामध्ये इरेझरसह एक पेन आणि बुक फोलिओचा समावेश आहे; ज्याची किंमत ५३,७९९ रुपये इतकी आहे. तसेच जर तुम्हाला यातील काही गोष्टी स्वतंत्रपणे घ्यायच्या असतील, तर मार्कर प्लस १३,५९९ आणि बुक फोलिओ १९,४९९ रुपयांना उपलब्ध आहेत. तसेच रीमार्केबल मोबाइल आणि डेस्कटॉप ॲप सबस्क्रिप्शन २९९ रुपये प्रतिमहिना किंवा प्रतिवर्ष २,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे