सध्याचा जमाना डिजीटल असल्यामुळे आपणाला कोणत्याही गोष्टीवरचा उपाय शोधणं खूप सोपं जातं. विज्ञानाच्या अविष्कारामुळे माणसाची अनेक कामे झटपट आणि सोप्पी होत आहेत. आपलं जीवनच अनेक मशीनवर अवलंबून आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आपल्या रोजच्या वापरात अनेक मशीनचा वापर केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, जेव्हा जेव्हा मशीन आणि माणसांचा विचार होतो, तेव्हा या दोघांमध्ये एकच फरक जाणवतो. तो म्हणजे, मशीन काम करू शकतात पण त्या माणसाप्रमाणे तर्क किवा वाद घालू शकत नाहीत. पण विज्ञान एवढं पुढं गेलं आहे की, आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे, मशीन तर्क लावू शकतात आणि वादही घालू शकतात. याबाबतचं एक ताज उदाहरण समोर आलं आहे.

हेही वाचा- Amazon च्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! आता भारतातील १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार कंपनी

आत्तापर्यंत आपण केवळ माणसांना शाररीक कामात मदत करणारे रोबोट पाहिली आहेत. तसंच प्रोग्रॅमिंगचे कामं रोबोटद्वारे केलेलंही पाहिलं आहे. मात्र, आता चक्क वादविवादाचे कामही आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे सोपवले जाणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले वकील फेब्रुवारीमध्ये आपला पहिला खटला लढवणार असल्याचंही आता सांगितलं जात आहे. पण या खटल्याची नेमकी तारीख किंवा कोर्टाबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

जगातील पहिला रोबोट वकील –

हेही वाचा- घरात मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवतेय? शेजारी कोणी ‘हे’ मशीन लावलं आहे का तपासा

जगातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटला ‘DoNotPay’ स्टार्टअपने तयार केला असून, हा रोबो फोनवर ऑपरेट करता येणार आहे शिवाय रिअल टाइममध्ये कोर्टाचे सर्व युक्तिवादही तो ऐकू शकणार आहे. जगातील पहिला रोबोट वकील पुढील महिन्यात आपल्या क्लायंटसाठी केस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- आता Whatsapp वरून करता येणार कॅब बुक; फक्त ‘या’ नंबरवर पाठवा Hi; खूपच सोपी आहे ट्रिक्स

सामान्य वकिलांप्रमाणे रोबोही हेडफोनद्वारे आपल्या क्लायंटला सुनावणीदरम्यान त्याला काय म्हणायचे आहे ते सांगेल. चॅटबॉटचे नाव ‘DoNotPay’ आहे आणि तो जोशुआ ब्राउडरने २०१५ मध्ये तयार केला होता. यापूर्वी तो केवळ ग्राहकांना थकलेली फी आणि दंडाची माहिती देण्याचे काम करायचा. परंतु आता तो केसदेखील लढवणार आहे.

वकिलांचा व्यवसाय धोका?

जोशुआ ब्राउडर म्हणतात की, युरोपीय न्यायालयात मानवी हक्कांसाठी लढणारे अनेक चांगले वकील आहेत पण त्यांची फी खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, चॅटबॉटद्वारे केस लढणे खूपच स्वस्त होईल कारण कागदपत्रांसाठी जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. केसनुसार त्याची फी २० हजार ते १ लाखापर्यंत असू शकते. त्यामुळे केस लढवणारे रोबो उपलब्ध झाल्यानंतर वकीलांचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याच्या चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robots will now argue in front of the judge in the court lawyers business in danger jap
First published on: 09-01-2023 at 11:41 IST