सॅमसंग कंपनीने भारतात Galaxy वॉच ६ सिरीज (Galaxy Watch 6) स्मार्टवॉचसाठी दोन नवीन फीचर्स लॉंच केली आहेत. स्मार्टवॉच Galaxy वॉच ६ मध्ये रक्तदाब (BP) आणि हृदयाचे ठोके तपासण्यास सक्षम असलेले इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) अशा दोन ट्रॅकिंग फीचर्सचा समावेश असेल. ही महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी सुरू झालेल्या ओव्हर-द-एअर (OTA) रोलाउटचा एक भाग आहे.

सॅमसंगचे या नवीन हेल्थ मॉनिटरची बीपी आणि ईसीजी ट्रॅकिंग ही वैशिष्ट्ये आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, फिटनेस दिनचर्येस मदत करणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आदींसाठी ते उपयुक्त आहे. ही फीचर्स ग्राहकांना स्मार्टवॉचमध्ये लॉंच करून घेण्याची इच्छा असेल, तर ते गॅलेक्सी स्टोअरमध्ये जाऊन ‘सॅमसंग हेल्थ मॉनिटर’ ॲप सोईस्करपणे डाउनलोड करून घेऊ शकतात. तसेच सॅमसंग कंपनीने सांगितले आहे की, गॅलेक्सी ६ बरोबरच आता गॅलेक्सी ४ व गॅलेक्सी ५ या स्मार्टवॉचमध्येही या फीचर्सचा समावेश केला जाईल.

हेही वाचा…सोशल मीडियामुळे मुलांच्या मानसिक आरोग्याला धोका! Meta च्या नवीन पॉलिसीने होणार अशी मदत

सॅमसंग हेल्थ मॉनिटर ॲपपद्वारे देण्यात येणाऱ्या बीपी आणि ईसीजी ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसाठी भारताच्या ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’कडून (CDSCO) नियामक मंजुरी आणि प्रमाणपत्रे मिळाल्याची खातरजमाही कंपनीने करून घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे घड्याळ वापरकर्त्यांना दिवसा आणि रात्रीदेखील फारच कामाचे आहे. ते युजर्सच्या झोपण्याची वेळ ठरवण्यास मदत करते. गॅलेक्सी वॉच ६ मध्ये ‘टॅप ॲण्ड पे’ फीचर ग्राहकांना जाता-येता पेमेंट करण्यास सक्षम करते. ग्राहकांना आरोग्याचे मार्गदर्शन, अपग्रेड डिझाइन, पेमेंट करण्याचा अनुभव प्रदान करणे ही या स्मार्टवॉचची उद्दिष्टे आहेत. तसेच ग्राहक स्मार्ट वॉचबरोबर मिळणाऱ्या नवीन ट्रेंडी स्ट्रॅपचा पर्याय एक्सप्लोर करू शकतात. एकंदरीत या स्मार्टवॉचमध्ये समावेशित केली गेलेली वैशिष्ट्ये युजर्सना चांगले आरोग्य राखण्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत.