Samsung ने भारतात आपल्या A सीरीजचे ५ नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे स्मार्टफोन Galaxy A53 5G, Galaxy A33 5G, Galaxy A23 आणि Galaxy A13 आहेत. सॅमसंगचे हे सर्व स्मार्टफोन पीच, ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट या चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असतील. नवीन Samsung Galaxy A सीरीज स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १४,९९९ रुपये आहे.
Samsung Galaxy A73 5G – हा सॅमसंग स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगने A73 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 778G 5G प्रोसेसर दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. Galaxy A73 5G स्मार्टफोनच्या स्क्रीनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.7-इंचाचा FHD + Infinity Zero Super AMOLED + 800 nits च्या पीक ब्राइटनेस आणि 120HZ च्या रिफ्रेशिंग रेटसह डिस्प्ले आहे.
यासोबतच, Galaxy A73 5G स्मार्टफोनमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आहे, ज्यामध्ये कंपनी ४ वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट आणि ५ वर्षांची सिक्यूरिटी अपडेट वॉरंटी देत आहे. यासोबतच सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर याला Knox सिक्युरिटीने प्रोटेक्ट केलं आहे. यासोबतच Samsung लवकरच Galaxy A73 5G स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू करणार आहे.
Samsung Galaxy A53 5G – या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5nm Exynos 1280 चिपसेट आहे. यासोबतच 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेशिंग रेट 120HZ आहे. याशिवाय Galaxy A53 5G स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आणि सॅमसंग Knox सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ३४,४९९ रुपये आहे आणि त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये आहे.
आणखी वाचा : जगातील ही प्रसिद्ध ठिकाणे, जी तुम्हाला गुगल मॅपवर पाहता येणार नाहीत, जाणून घ्या कारण
Samsung Galaxy A33 5G – या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5nm Exynos 1280 चिपसेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेशिंग रेटसह 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याचवेळी संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आणि सॅमसंग नॉक्स देण्यात आले आहेत. Samsung ने Galaxy A33 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे जी 25w फास्ट चार्जरला सपोर्ट करते. Samsung Galaxy A33 5G च्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत १९,४९९ रुपये आहे आणि त्याच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे.
Samsung Galaxy A23 – सॅमसंगच्या या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 680 4G चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस 50MP कॅमेरा आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy A23 स्मार्टफोनला 6.6-इंचाचा FDH+ डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेशिंग रेटसह येतो.
Samsung Galaxy A13 – सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Exynos 850 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. Samsung Galaxy A13 स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे आणि त्याच्या 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आणि 6GB + 64GB व्हेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये आहे.