scorecardresearch

जगातील ही प्रसिद्ध ठिकाणे, जी तुम्हाला गुगल मॅपवर पाहता येणार नाहीत, जाणून घ्या कारण

द सनच्या रिपोर्टनुसार, गुगल मॅप्सने आपल्या मॅप्स अॅपवरून 10 हून अधिक ठिकाणे काढून टाकली आहेत. यामागे सर्वत्र वेगवेगळी कारणे आहेत. या ठिकाणांबद्दल माहिती आणि त्यांना Google वरून काढून टाकण्याचे कारण जाणून घ्या…

Google-Maps-places-Ban
(प्रतीकात्‍मक फोटो)

जगात अशी काही प्रमुख ठिकाणे आहेत, जी तुम्ही Google Maps वर देखील पाहू शकत नाही. द सनच्या रिपोर्टनुसार, गुगल मॅप्सने आपल्या मॅप्स अॅपवरून 10 हून अधिक ठिकाणे काढून टाकली आहेत. यामागे सर्वत्र वेगवेगळी कारणे आहेत. या ठिकाणांबद्दल माहिती आणि त्यांना Google वरून काढून टाकण्याचे कारण जाणून घ्या…

टिम कुक हाऊस: हे अॅपल कंपनीच्या सीईओचे घर आहे, महिलांनी हेरगिरी केल्याच्या प्रकरणामुळे या ठिकाणासाठी Google आणि अॅपल मॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचे घर कॅलिफोर्नियातील पालो अल्टो इथे आहे. ज्याची किंमत २५ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोरुरो, फ्रेंच पॉलिनेशिया: हे दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक मोरुरा प्रवाळ आहे, जे फ्रान्सच्या हद्दीत येते. ते हटवण्यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या बेटाला अण्वस्त्रांचा इतिहास असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत लोकांचे नुकसान होऊ नये, या कारणासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

Prison de Montlucon, France: मध्य फ्रान्समधील हे तुरुंग गुगल मॅपवर नोंदवले गेले होते, परंतु फ्रेंच सरकारच्या विनंतीवरून हे ठिकाण काढून टाकण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्यात आल्याचे फ्रान्स सरकारने म्हटले होते.

2207 Seymour Avenue, Ohio: गुन्ह्याची कथा असलेल्या घराचे हे स्थान आहे. या ठिकाणी एरियल कॅस्ट्रो नावाच्या व्यक्तीने 2002 ते 2004 दरम्यान काही मुलींचे अपहरण करून त्यांना या घरात डांबून ठेवले होते. या व्यक्तीने 2013 पर्यंत मुलींना कैद करून ठेवले होते. ही जागा गुगल मॅपवरूनही काढून टाकण्यात आली आहे.

अमचिटका बेट, अलास्का: अमचिटका बेटावर 50, 60 आणि 70 च्या दशकात अमेरिकेची अणुचाचणी करण्यात आली. अमेरिकेने येथे अनेक भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत. त्यामुळे गुगल मॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

ग्रीक मिलिटरी बेस: ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये असलेला हा लष्करी तळ गुगल मॅपवर पूर्णपणे पिक्सेलेटेड आहे. हे सुरक्षेच्या कारणास्तव आहे.

फ्रेंच न्यूक्लियर फॅसिलिटी: फ्रान्समधील हे एक खास ठिकाण आहे, जिथे अणुइंधनाची सुविधा दिली जाते. हे ठिकाण संवेदनशील असल्याने गुगलवर बंदी घालण्यात आली आहे. हे 1976 मध्ये उघडण्यात आले होते, येथून अनेक देशांना अणू दिले जाते.

आणखी वाचा : कन्फर्म! Samsung Galaxy M33 5G भारतात या दिवशी लॉन्च होईल, जाणून घ्या फिचर्स

पोलंडच्या स्पेशल फोर्सेस बेस: पोलंडच्या स्पेशल फोर्सेस कमांडला प्रशिक्षण दिले जाते. या कारणास्तव, देशाच्या आदेशानुसार गुगल मॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

Patio de los Naranjos, Spain : स्पेन मध्ये असलेले : Patio de los Naranjos सरकारी कार्यालयांच्या जवळ आहे. त्यावर बंदी का घालण्यात आली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

स्टॉकटन-ऑन-टीजमधील घर: प्रीस्पोर्ट रोड, यूकेवरील हे ठिकाण Google मॅप वरून काढून टाकण्यात आले आहे. ते मॅप वरून का काढले आहे हे स्पष्ट नाही.

जेनेट बेट, रशिया: हे १.२ मैल लांब बेट वर्षभर बर्फाने झाकलेले असते. अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणावामुळे या बेटावर बंदी घालण्याचे कारण गुगल मॅपवर अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर कोरिया: दक्षिण कोरियामध्ये अनेक ठिकाणी गुगलवर बंदी आहे, त्याबद्दल कोणतीही माहिती नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2022 at 23:26 IST