scorecardresearch

VIDEO: Snapchat ने लॉन्च केला चॅटजीपीटीवर आधारित भन्नाट My AI चॅटबॉट, म्हणाले ”सध्या फक्त…”

हा ChatBot या आठवड्यात रिलीज करण्यात येणार आहे.

snapchat launch my ai chatbot
My AI chatbot (image credit- Snapchat/Twitter)

Snapchat हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या स्नॅपचॅटने ChatGpt वर आधारित आपला चॅटबॉट My AI लॉन्च केला आहे. या आधी OpenAI ने chatgpt हा chatbot लॉन्च केला आहे. हा चॅटबॉट सध्या प्रायोगिक चॅटबॉट फीचर म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने याची घोषणा सोमवारी केली आहे. AI चॅटबॉट सुरुवातीच्या काळात स्नॅपचॅट प्लस असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी एक प्रयोग म्हणून आणला जाणार आहे. जो या आठवड्यामध्ये रिलीज केला जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

एका अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये स्नॅपचॅटने म्हटले आहे की, ”आम्ही आमचा एआय चॅटबॉट My AI प्रायोगिक तत्वावर लॉन्च करत आहोत. जे ओपनएआयच्या जीपीटी टेक्नॉलॉजीवर काम करेल. हा चॅटबॉट या आठवड्यात लॉन्च केला जाणार आहे. हा चॅटबॉट सध्या फक्त स्नॅपचॅट प्लसवर सब्स्क्रिप्शन असणाऱ्या वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. काही महिन्यांमध्ये ते सर्वच वापरकर्त्यांसाठी सुरु होऊ शकते.

हेही वाचा : Tech Layoffs: Google ची नोकरी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याने मांडली व्यथा; म्हणाली, “माझ्या ६ वर्षाच्या मुलीला…”

तसेच कंपनीने दे देखील स्पष्ट केले आहे की, My AI त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही चुका करू शकतो. परंतु चॅटबॉटद्वारे कोणतीही “पक्षपाती, चुकीची, हानिकारक किंवा दिशाभूल करणारी माहिती देण्याचे टाळणे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तसेच स्नॅपचॅट कंपनी चॅटबॉटचे पुनरावलोकन करण्यासाठी सर्व चॅट सेव्ह करणार आहे. वापरकर्त्यांच्या रिव्ह्यू आणि फीडबॅकच्या आधारे कंपनी त्यामध्ये सुधारणा आणि आवश्यक बदल करू शकते. स्नॅपने आपल्या वापरकर्त्यांना AI चॅटबॉटसह वैयक्तिक आणि गोपनीय माहिती सार्वजनिक करणे हे टाळण्यास सांगितले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 12:24 IST
ताज्या बातम्या