Airtel Spam Fighting Solution : एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी स्पॅम कॉल्स (Spam Calls) आणि मेसेजच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारतातील पहिले नेटवर्क-आधारित, AI-शक्तीवर चालणारे स्पॅम-फाइटिंग सोल्युशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील दूरसंचार सेवा प्रदात्याने केलेला पहिला प्रयोग आहे. हे साधन ग्राहकांना सर्व संशयास्पद स्पॅम कॉल्स आणि एसएमएसबद्दल रिअल-टाईममध्ये अलर्ट करेल..

तर भारती एअरटेल, भारतातील पहिले स्पॅम-फायटिंग नेटवर्कने त्याचे AI-पॉवर्ड नेटवर्कवर चालणारे (Spam Fighting Solution), स्पॅम-फायटिंग सोल्युशन लाँच केल्यानंतर केवळ अडीच महिन्यांच्या आत तब्बल ८ अब्ज स्पॅम कॉल्स आणि ०.८ अब्ज स्पॅम एसएमएस फ्लॅग केले आहेत. या प्रगत अल्गोरिदमचा फायदा घेत, AI नेटवर्क सोल्युशनने दररोज जवळपास एक दशलक्ष स्पॅमर्स ओळखण्यात मदत झाली आहे.

pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri Chinchwad is disconnecting water supply to properties with overdue water bills
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचा ‘एसएमएस’ खरा की खोटा? महापालिका प्रशासनाने सांगितले…
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Kolkata is India’s most congested city in 2024
India’s Most Congested City in 2024 : सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं? नवं सर्वेक्षण काय सांगतं?
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
religious fanaticism
धार्मिक कट्टरता कमी करणे आवश्यक! अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांचे आवाहन
Torres Scam in Mumbai
Torres Scam in Mumbai : टोरेस कंपनीत १३ कोटी बुडाले… भाजी विक्रेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?

कंपनीने गेल्या २.५ महिन्यांत जवळपास २५२ दशलक्ष अद्वितीय ग्राहकांना या संशयास्पद कॉल्सबद्दल सतर्क केले आहे आणि त्यांना उत्तर देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत १२ टक्के घट झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. एअरटेल नेटवर्कवरील सर्व कॉलपैकी सहा टक्के स्पॅम कॉल म्हणून ओळखले गेले आहेत; तर सर्व एसएमएसपैकी 2 टक्के स्पॅम म्हणून ओळखले गेले आहेत. विशेष म्हणजे असे आढळून आले आहे की, तब्बल ३५ टक्के स्पॅमर्सनी लँडलाईन टेलिफोनचा वापर केला आहे.

त्याव्यतिरिक्त दिल्लीतील ग्राहकांना सर्वाधिक स्पॅम कॉल (Spam Fighting Solution) प्राप्त झाले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश मग दिल्ली येथे सर्वाधिक स्पॅम कॉल्स आणि त्यानंतर मुंबई आणि कर्नाटक यांचा नंबर आहे. एसएमएसच्या बाबतीत सर्वांत जास्त संख्या गुजरात, त्यानंतर कोलकाता व उत्तर प्रदेश आणि सर्वाधिक ग्राहक मुंबई, चेन्नई व गुजरातमधील आहेत, असे सांगण्यात आले आहेत.

हेही वाचा…Lifetime Warranty For Green Line : आता मोबाईलच्या स्क्रीनवर येणार नाही ‘ग्रीन लाइन’; OnePlus ने सर्व स्मार्टफोन्सला दिली लाईफटाइम वॉरंटी

स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेज (Spam Fighting Solution ) :

रिपोर्टनुसार, सर्व स्पॅम कॉलपैकी ७६ टक्के ग्राहक वर्ग पुरुष आहेत. त्याव्यतिरिक्त वयोगटातील लोकसंख्येनुसार स्पॅम कॉलमध्ये फरक नोंदवले गेले आहेत, ज्यामध्ये ३० ते ६० वयोगटातील ग्राहकांना ४८ टक्के स्पॅम कॉल प्राप्त झाले आहेत आणि २६ ते ३५ वयोगटातील ग्राहकांना २६ टक्के स्पॅम कॉल करण्यात आले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के स्पॅम कॉल्स करण्यात आले आहेत.

कंपनीने दिवसभरातील स्पॅम कॉल्सवर लक्ष ठेवले. स्पॅम कॉल सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होतात आणि दिवस जसजसा पुढे जातो, तसतसा स्पॅम कॉल्स वाढत जातात. स्पॅम ॲक्टिव्हिटी दुपारी ३ दरम्यान जास्त आढळून येतात. त्याशिवाय आठवड्याचे शेवटचे दिवस म्हणजेच शनिवार व रविवारदरम्यान स्पॅम कॉलच्या संख्येत मोठा फरक दिसून आला आहे. रविवारी या कॉलची संख्या सुमारे ४० टक्क्यांनी कमी होते. विशेषत: १५ हजार रुपये ते २० हजार रुपये किमतीच्या डिव्हायसेसवर सुमारे २२ टक्के स्पॅम कॉल्स येतात, असे दिसून आले आहे.

अनेक पॅरामीटर्सचे सखोल विश्लेषण करून, AI-ड्रीव्हन सिस्टीमने स्पॅम कॉल्स (Spam Fighting Solution) अत्यंत अचूकतेने रिअल टाइममध्ये ओळखण्यात यश मिळवले आहे. या उपक्रमामुळे स्पॅमच्या वाढत्या समस्येवर संपूर्ण तोडगा देणारी एअरटेल ही भारतातील पहिली सेवा प्रदाता कंपनी बनली आहे आणि ग्राहकांच्या गोपनीयता आणि सोयींना प्राधान्य देत उद्योगात नवीन सुरक्षा उपकरणे स्थापित केली आहेत.

पण, ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, भारत सरकारने (GoI) सेवा आणि व्यवहार कॉलसाठी १६० डिजिट नंबर १० अंकी क्रमांक दिले आहेत. ज्या ग्राहकांनी डू-नॉट-डिस्टर्ब (DND) चा पर्याय निवडला नाही आणि प्रमोशनल कॉल्स प्राप्त करण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे, त्यांना १४० डिजिट नंबर असलेल्या १० अंकी क्रमांकावरून स्पॅम कॉल प्राप्त होत राहतील.

Story img Loader