Swiggy Starts Platform Fee: ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर (online food delivery) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर यापुढे तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. आपण सर्वजण खाण्याचे खूप शौकिन असतो. कधी कधी आपल्याला काही विशेष पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण बनवायचा कंटाळा येतो, अशा वेळेला आपण ऑनलाईन ऑर्डर करतो. तर आता ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी म्हणजेच स्विगी. तुम्ही सर्वांनी स्विगीकडून कधी ना कधी जेवण ऑर्डर केले असेलच. पण आता जेवणाची ऑर्डर देणे पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. वास्तविक, स्विगीने काही शहरांमध्ये खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी शुल्क वाढवले ​​आहे.

स्विगी कंपनी सर्व युजर्सकडून प्रति फूड ऑर्डरसाठी ‘इतके’ रुपये वसूल करणार

स्विगीने ग्राहकांकडून ऑर्डरवर प्लॅटफॉर्म फी म्हणून २ रुपये अतिरिक्त आकारण्यास सुरुवात केली आहे. सध्या ही वाढलेली किंमत केवळ हैदराबाद आणि बेंगळुरूच्या ग्राहकांसाठी लागू आहे. म्हणजेच, जर तुम्ही या दोन शहरांमध्ये राहत असाल आणि जेवणाची ऑर्डर किती असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म फी म्हणून २ रुपये जादा द्यावे लागतील. या पैशातून डिलिव्हरी सेवा अधिक चांगली होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या या वाढलेल्या किमती मुंबई आणि दिल्लीतील लोकांना अॅपवर दिसत नाहीत. तसे, असे म्हटले जात आहे की कंपनी त्यांची सर्वत्र अंमलबजावणी करेल.

(हे ही वाचा : भारतातील ‘या’ मोठ्या उद्योगपतीने Elon Musk ला दिला दणका! ब्लू टिक हटताच Tesla कार खरेदीचा प्लॅन केला रद्द )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या’ वस्तूंवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही

ग्राहकांना खाद्यपदार्थांवर फक्त २ रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. हे Swiggy Instamart वर लागू होत नाही. कंपनी देशभरात दररोज २० लाखांहून अधिक ऑर्डर वितरित करते. रमजानच्या महिन्यात हैदराबादच्या लोकांनी १० लाख बिर्याणी आणि ४ लाख हलीमची ऑर्डर दिली होती. मार्च महिन्यात, कंपनीने सांगितले की त्यांनी गेल्या वर्षी लोकांना ३३ दशलक्ष इडली प्लेट्स वितरित केल्या होत्या.