२०११ मध्ये, गुगलने ‘ऑटोफिल’ हे फीचर लाँच केले. हे फीचर आल्याने युजर्सचे आयुष्य अधिक सुसह्य झाले असून क्रोममध्ये पासवर्ड सेव्ह झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा टाईप करण्याचा त्रास कमी झाला आहे. यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्हीची बचत होते. ऑटोफिल हे फीचर विशेषतः अशा साइटसाठी खूप उपयुक्त आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग नाही, परंतु सर्फ करण्यासाठी आपल्याला त्यावर आयडी, पासवर्ड आणि इतर तपशील भरावे लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीकधी ऑटोफिल ऑप्शनमुळे त्रास देखील होतो. हे तेव्हा होते जेव्हा आपण साइटवर इतर काहीतरी टाइप करत असतो आणि ऑटोफिल पॉप-अप पुन्हा पुन्हा समोर येतो. पण क्रोमने हे पॉप अप मॅनेज करण्यासाठी ऑप्शन दिला आहे. क्रोममध्ये ऑटोफिल मॅनेज करण्याची सुविधा आहे. क्रोममध्ये सेव्ह केलेला तुमचा पासवर्ड, कार्ड तपशील आणि पत्ता तुम्ही सहजपणे कसा डिलीट करू शकता हे जाणून घ्या.

Poco F4 GT आणि Oppo Reno8 Pro सोबतच लवकरच लॉंच होणार नवे स्मार्टफोन्स; आकर्षक किमतींसोबत मिळणार जबरदस्त फीचर्स

  • सर्व प्रथम क्रोम ब्राउझर उघडा.
  • आता वरच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या तीन उभ्या ठिपक्यांवर टॅप करा.
  • आता सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा, जो तुम्हाला ड्रॉप डाउन मेनूमध्ये दिसेल.
  • आता डाव्या साइडबारमधून ऑटोफिल टॅबवर क्लिक करा.
  • येथे तुम्ही सेव्ह पासवर्ड, पेमेंट, पत्ता ऑटोफिल डेटा एकाच वेळी स्वतः डिलीट करू शकता.
  • जर तुम्हाला संपूर्ण ऑटोफिल डेटा एकाच वेळी डिलीट करायचा असेल, तर डाव्या पॅनलमधून प्रायव्हसी अँड सेक्युरिटी वर क्लिक करा.
  • क्लियर ब्राउझिंग डेटा वर क्लिक करा.
  • येथे अ‍ॅडव्हान्स टॅबमधून डेटा आणि पासवर्ड आणि इतर साइन-इन डेटामधून ऑटोफिल निवडा.
  • आता क्लिअर डेटा बटणावर टॅप करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech trick how to delete a password saved on google chrome find out pvp
First published on: 10-06-2022 at 18:05 IST