scorecardresearch

Premium

TECNO SPARK 8 Pro भारतात लाँच, किंमत ११,००० रुपयांपेक्षाही कमी!

स्‍पार्क ८ प्रो विन्‍सर व्‍हायलेट, कोमोडो आयलँड, टर्कोइज सियान व इंटरसेलर ब्‍लॅक या चार आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

TECNO SPARK 8 Pro
नवीन व्‍हेरिएण्‍ट बाजरात लाँच (फोटो: PR )

टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने त्‍यांच्‍या लोकप्रिय स्‍पार्क सिरीजअंतर्गत नवीन व्‍हेरिएण्‍ट ‘स्‍पार्क ८’ लाँच केला. स्‍पार्क ८ प्रो मर्यादित कालावधीसाठी १०,५९९ रूपये या विशेष सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये ४ जानेवारी २०२२ पासून अॅमेझॉन स्‍पेशल्‍सवर खरेदी करता येऊ शकतो.

स्‍पे᠎सिफीकेश्न्स काय आहेत?

या फोनमध्ये ३३ वॅट सुपर-फास्‍ट चार्जर, ४८ मेगापिक्‍सल ट्रिपल रिअर कॅमेरा, हेलिओ जी८५ प्रोसेसर, विशाल ६.८ इंच एफएचडी डॉट-इन-डिस्‍प्‍ले आणि प्रचंड क्षमतेची ५,००० एमएएच बॅटरी आहे. स्‍पार्क ८ प्रो गतीशील लाइफस्टाइल व मीडियाचा वापर करण्‍याची आवड असलेल्‍या भारताच्‍या जनरेशन झेड ग्राहकांना एकसंधी स्‍मार्टफोन अनुभव देत मनोरंजनाचा दर्जा उंचावण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. स्‍पार्क ८ प्रो विन्‍सर व्‍हायलेट, कोमोडो आयलँड, टर्कोइज सियान व इंटरसेलर ब्‍लॅक या चार आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

Buy google pixel 7a rupees 4,700 rs flipkart big billion days sale
४,७०० रुपयांमध्ये खरेदी करा Google Pixel 7a; ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतेय आकर्षक ऑफर, एकदा पाहाच
whatsapp ban 74 lakh indian accounts in august 2023
WhatsApp ची मोठी कारवाई; भारतात तब्बल ७४ लाखांपेक्षा अधिक अकाउंट्सवर घातली बंदी, काय आहे कारण?
iphone 15 sale today in india with massive discount
iPhone 15 Series Sale In India: भारतात आजपासून विक्रीला सुरूवात; झटपट कॅशबॅकसह मिळणार…, फीचर्स एकदा बघाच
iphone 15 series india price comparsion to usa dubai and china
अमेरिका, दुबई, जपानपेक्षा iPhone 15 Series भारतात स्वस्त आहे की महाग? जाणून घ्या किंमत

(हे ही वाचा: New Year 2022: १ जानेवारी २०२२ पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे, नियम बदलणार)

हेलिओ जी८५ सुपरफास्‍ट प्रोसेसर

स्‍पार्क ८ प्रो मध्‍ये गेमिंग अनुभवासाठी २ गिगाहर्टझ ऑक्‍टा-कोअर आर्म कोर्टेक्‍स ए७५ सीपीयू व १ गिगाहर्टझ माली जी५२ जीपीयू आहे. यामधील हायपरइंजिन तंत्रज्ञानासह इंटेलिजण्‍ट डायनॅमिक सीपीयू व जीपीयू मॅनेजमेंट एकसंधी कार्यक्षमता व बहुस्‍तरीय ऑप्टिमायझेशन देतात.

(हे ही वाचा: Google Pay New Rule : १ जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार)

५००० एमएएच शक्तिशाली बॅटरी

स्‍पार्क ८ प्रो मध्‍ये विशाल ५००० एमएएच बॅटरी आहे. यामुळे जवळपास ६३ दिवसांपर्यंत स्‍टॅण्‍डबाय टाइम व १६० तासांचे म्‍युझिक प्‍लेबॅक टाइम मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tecno spark 8 pro launched in india priced at less than rs 11000 ttg

First published on: 02-01-2022 at 11:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×