Solar Power Bank: भारतात अनेक ब्रँड पॉवरबँक उपलब्ध आहेत ज्यांना ग्राहक सहजपणे खरेदी करू शकतात, परंतु त्यांच्यातील समस्या अशी आहे की जर तुम्ही त्या चार्ज करायला विसरलात तर तुम्ही त्यांचा वापर देखील करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही गरजेवेळी डिव्हाइस देखील चार्ज करू शकत नाही. मात्र, तुमच्यासोबत इतर अनेक लोकही याच समस्येने त्रस्त आहेत. जर तुम्हाला ही पॉवर बँक वापरायची नसेल, तर आज आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या आणखी एका मजबूत पॉवर बँकबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या टॅबलेट, स्मार्टफोनसह इअरबड देखील चार्ज करू शकता आणि यासाठी तूम्हाला ही पॉवर बँक चार्ज करण्याची देखील गरज नाही. कोणत्याही इलेक्ट्रिसिटीशिवाय तुम्ही ही पॉवरबँक चार्ज करू शकता. कसे ते जाणून घ्या.

ही पॉवर बँक कोणती आहे?

खरं तर आपण ज्या पॉवर बँकबद्दल बोलत आहोत ती सामान्य पॉवर बँक नसून सोलर पॉवर बँक आहे. तुम्ही ती अमेझॉनवर खरेदी करू शकता आणि तुम्हाला ती चार्ज करण्याची देखील गरज नाही. ही पॉवरबँक चार्ज करण्यासाठी तुम्हाला ती फक्त सूर्यप्रकाशात ठेवावी लागेल, आणि काही तासांनंतर सुर्यप्रकाशातून काढावी लागेल. त्यानंतर ती चार्ज झालेली असेल. सोलर पॅनेल व्यतिरिक्त, सामान्य पॉवर बँकेच्या तुलनेत तुम्हाला यामध्ये नवीन काहीही पाहायला मिळणार नाही. जर तुम्हाला ही पॉवरबँक तुमच्यासोबत एखाद्या ठिकाणी घेऊन जायची असेल, तर ती चार्ज करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त काही वेळ या पॉवरबँकला उन्हामध्ये ठेवावी लागेल.

( हे ही वाचा: Vodafone Idea 5G Launch: जाणून घ्या Vi 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत आणि वैशिष्ट्ये

जर आपण किंमत आणि वैशिष्ट्याबद्दल बोललो तर ही पॉवरबँक आकाराने सामान्य पॉवरबँक सारखी आहे परंतु त्याचे वजन थोडे जास्त आहे. वास्तविक, त्यात एक सोलर पॅनल बसवले आहे, ज्यामुळे त्याचे वजन थोडे वाढते. आता त्याच्या किंमतीबद्दल बोलायचं, तर ग्राहक ही पॉवरबँक २००० रुपयांना खरेदी करू शकतात.